Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Narendra Modi UAE Visit : पीएम मोदी अबूधाबीतील मंदिरात दाखल, आज होणार लोकार्पण
Narendra Modi UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी अबूधाबीतील मंदिरात पोहोचले आहेत. अबूधाबीतील हिंदू मंदिराचे आज (दि.14) उद्घाटन होणार आहे. पीएम मोदींच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण होईल.
इस्लामिक राष्ट्रातील हिंदूचे हे सर्वांत मोठे मंदिर आहे.
परभणी : भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घातला कार्यकारी अभियंत्यांना घेराव
रब्बी हंगामासाठी जायकवाडी धरणातील 2 पाणी पाळ्या मंत्रीगटाच्या कालवा सल्लागार समितीकडून जाहीर करण्यात आल्या मात्र परभणीतील जायकवाडीच्या मायनर 64 या कालव्याला पाणी मिळत नसल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे त्यामुलर तात्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी परभणीतील जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता मयुरा जोशी यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला.. जायकवाडी पाटबंधारे कार्यालयात आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी ठिय्या देत घेराव घातला..जर तात्काळ पाणी सोडण्यात आले नाही तर संभाजी नगर येथील विभाग कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे..
Yavatmal : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वस्त धान्यावर मारला डल्ला
मिलिंद देवरा यांचे नाव निश्चित
शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांचे नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्याचं समजतेय. एकनात शिंदेंकडून थोड्याच वेळात याबाबात घोषणा करण्यात येईल.
"भंडारा चिन्नर" तांदूळ आता जगभरात ओळखला जाणार
भंडारा जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या चिन्नोर तांदळाला भौगोलिक नामांकन म्हणजेच 'जी आय टॅगिंग' प्राप्त व्हावे, यासाठी भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांचा मागील दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडं सातत्यानं पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडं त्यांनी केलेल्या प्रयत्नांच्या या पाठपुराव्यामुळं आता जगभर चिन्नोर तांदूळ 'भंडारा चिन्नोर' या नावानं ओळखला जाणार आहे. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे एक जिल्हा एक उत्पादन ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्राकडून 60 टक्के, तर राज्याकडून 40 टक्के अनुदान मिळणार आहे.