एक्स्प्लोर

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमत झाल्याची चर्चा 

Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा (Rajya Sabha Election) जांगांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावर सकारात्मक चर्चा झाली आहे.

Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा (Rajya Sabha Election) जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. महायुतीकडे 5 जागा तर महाविकास आघाडीकडे (MVA) एका जागा गेल्याचं समजतेय. येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे उमेदवार राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावर एकमत झाल्याची राजकीय चर्चा सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar)यांचा गट निवडणुकीत उमेदवार न देण्याची शक्यता आहे.   

राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 6 खासदारांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे या जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे तीन, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या एका खासदाराचा समावेश आहे. भाजपच्या नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही. मुरलीधरन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहेत. तर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या 6 जागांवर आता कोण उमेदवार असणार आणि कुणाची नियुक्ती केली जाईल? याबाबत  तर्कवितर्क लढवले जात आहेत.

महायुतीचे पाच उमेदवार कोणते ?

भाजपने त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये आघाडीवर विनोद तावडे यांचे नाव असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे.आता केंद्रीय नेतृत्व लवकरच नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे भाजपच्या गोटातून समजतंय. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे हे उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत. बिहारच्या सत्तांतरात त्यांनी बजावलेली भूमिका आणि हरियाणात केलेली कामगिरी  याचं बक्षीस त्यांना मिळेल असा बांधला जातोय. दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर नाराज असलेल्या ओबीसी समजाची नाराजी दूर करण्यासाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची भाजप रणनिती आखतय. एकीकडे भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असताना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार कोण असतील याचीही चर्चा रंगलीय.. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळू शकते असा अंदाज आहे..तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे..

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल

भाजप : 104, 
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 42
 शिवसेना (एकनाथ शिंदे गट): 40
काँग्रेस : 45
शिवसेना उद्धव ठाकरे गट : 16
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 11
बहुजन विकास आघाडी : 3, 
समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी 2, 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी 1 
अपक्ष 13

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 21 January 2024Girish Kuber on Donald Trump:  डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 21 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Embed widget