एक्स्प्लोर

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या 'उत्तर सभेतील' 10 महत्त्वाचे मुद्दे

Raj Thackeray : जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलनं समाचार घेतला. राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया.

Raj Thackeray :  . गुढीपाडव्याला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. आजच्या भाषणात राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिलं जर 3 मे पर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर देशभर हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय, आजच्या भाषणात भोंग्यांवरुन टीका करणाऱ्या मविआ नेत्यांवरही राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलनं समाचार घेतला. राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया.

Raj Thackeray on Sharad Pawar :  शिवरायांचे नाव घेतले तर मुस्लीम मते जातील, अशी शरद पवारांना भीती   : राज ठाकरे

महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे.  शरद पवार कोणत्याही सभेत छत्रपती शिवाजींचे नाव घेत नाही. ते काय शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार हे नास्तिक आहेत. शिवरायांचे नाव घेतले तर मुस्लीम मते जातील, अशी भीती शरद पवारांना आहे. घराघरात शिवाजी महाराजांना पोहचवण्याचे काम बाबासाहेब पुरंदरेने केले आहे. बाबासाहेब पुरंदरे हे पवारांसाठी सॉफ्ट टार्गेट आहेत. शरद पवारांना इतिहास नाही, तर जात बघायची आहे. 

Raj Thackeray on  Maratha Reservation : निवडणुकींसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापवण्यात येत आहे : राज ठाकरे

  मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे निघाले. पण त्याचं पुढे झालं काय असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राजकरणासाठी वापरण्यात आला. आता  निवडणुकींसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापवण्यात येत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. 

 Raj Thackeray on Ajit Pawar : अजित पवारांना 'लाव रे तो व्हिडीओ'च्या माध्यमातून उत्तर

मशिदीच्या भोंग्यावर मी  या आधी देखील बोललो आहे. पण त्याचा झाले असे,  सकाळच्या शपथविधीनंतर पवारांनी आवाज काढला. त्यानंतर अजित पवारांना तीन, चार महिने ऐकू येत नव्हते. हे अजित पवारांना ऐकू आले नाही. लॉकडाऊननंतर कान साफ झाले, त्यामुळे अजित पवारांना गुढी पाडव्याचा भोंगा ऐकू आला. 

Raj Thackeray on Supriya Sule : सुप्रियांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे  : राज ठाकरे

 अजित पवारांच्या घरी रेड पडली, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. एकाच घरात राहून रेड टाळणं सुप्रिया सुळेंनाा कसं जमलं?  असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. सुप्रियांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे. 

Raj Thackeray on Sanjay Raut : यांची प्रॉपर्टी जप्त केली तर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिव्या दिल्या : राज ठाकरे

 पत्रकार परिषदेत एखाद्या वर्तमानपत्राचा संपादक अतिशय खालच्या दर्जेची भाषा वापरतो.  यांची प्रॉपर्टी जप्त केली तर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिव्या दिल्या. नाव न घेता राज ठाकरेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे

Raj Thackeray on Sharad Pawar : राज ठाकरे नाही तर शरद पवारांनी भूमिका बदलली : राज ठाकरे

देशाला परदेशी पंतप्रधान चालणार नाही, ही बोलणारी बाळासाहेब ठाकरे ही पहिली व्यक्ती. त्यानंतर हा धागा पकडत शरद पवार पक्षातून बाहेर पडले. निवडणुकानंतर पुन्हा दोन महिन्याात भूमिका बदलली आणि कृषीमंत्री झाले. राज ठाकरेंनी नाही तर शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली

Raj Thackeray Uttarsabha Live Updates : राज्यातील सर्व मशिदीवरचे 3 मे पर्यंत भोंगे उतरवा : राज ठाकरे

 मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं.  3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा. आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही : राज ठाकरे

Raj Thackeray on Uniform Civil Code : देशात समान नागरी कायदा आणा : राज ठाकरे

  देशात समान नागरी कायदा आणा. देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा असे नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे. या गोष्टी  देशात होणे आवश्यक आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे

Raj Thackeray Uttar Sabha : जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले : राज ठाकरे

  भुजबळांना त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे आत जावं लागलं.  दोन अडीच वर्षे जेल मध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेता. जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget