Maharashtra Rains Live Updates: सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद
Maharashtra Rains Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Rains Live Updates: दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झालाय. इतका इतका पाऊस झाला की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय आणि जनजीवन ठप्प झालं. धाराशीव, बीड, जालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालंय. ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं. तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आलीय. राज्यभरात 70 लाख एकरच्यावर आतापर्यंत नुकसान झालंय. यासाठी 2100 कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करुन मदत देण्याचे आदेश आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देण्यात आले. सर्व मंत्र्यांनी दुष्काळी दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी धाराशिवमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
तीन दिवसाच्या खंडानंतर नागपुरात पावसाला सुरुवात
Nagpur Rain
तीन दिवसाच्या खंडानंतर नागपुरात पावसाला सुरुवात झाली आहे..
सकाळपासून शहरात सर्वत्र ऊन असताना दुपारी चार नंतर ढग दाटून आले आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली... तत्पूर्वी दुपारी तीन वाजेपर्यंत दमट हवामानामुळे नागपूरकरांच्या घामाच्या धारा वाहत होत्या...
दरम्यान नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात आज येलो अलर्ट जारी केला होता.. तर उद्या गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात अडकलेल्या दोघांना सुखरूप वाचवलं
सोलापूर ब्रेकिंग
---
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात अडकलेल्या दोघांना सुखरूप वाचवलं
सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीत जाऊन या लोकांची सुटका केली
मागील काही तासापासून हे दोघे एका पेट्रोलपम्पवर अडकून होते
मात्र बचाव पथकाने त्यांची सुखरूप सुटका केलीय
सोलापूर जिल्हा मध्ये आलेल्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सांगली जिल्ह्यातून बचाव पथक आलं आहे
हत्तूर गावात या पथकाने 10 लोकांची आणि काही जाणवरंची देखील सुटका केलीय
























