Maharashtra Rains : राज्यभरात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू
Maharashtra Rains : महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू झाला असून 181 जनावरं दगावली आहेत. आतापर्यंत 7963 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
Maharashtra Rains : राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसात आतापर्यंत 99 जणांचा बळी गेला आहे तर 181 जनावरं दगावली आहेत. तर आजवर 7 हजार 963 नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.
आज पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतही पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे लोकल वाहतूक आणि रस्ते मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.
तिकडे गुजरातमध्येही पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरला आहे. परिणामी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पाणी कमी झालं आहे. त्यामुळे या मार्गावर बंद असलेली वाहतूक पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
खबरदारी म्हणून विविध जिल्ह्यात NDRF आणि SDRF ची पथकं तैनात
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे NDRF आणि SDRF च्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत. राज्यात विविध जिल्ह्यात एकूण 14 एनडीआरएफ आणि 6 एसडीआरएफ पथकं तैनात आहेत.
जिल्ह्याचे नाव NDRF/SDRF
मुंबई (कांजुरमार्ग 1, घाटकोपर 1) 2 एनडीआरएफ पथकं
पालघर 1 एनडीआरएफ पथक
रायगड- महाड 2 एनडीआरएफ पथकं
ठाणे 2 एनडीआरएफ पथकं
रत्नागिरी-चिपळूण 2 एनडीआरएफ पथकं
कोल्हापूर 2 एनडीआरएफ पथकं
सातारा 1 एनडीआरएफ पथक
सिंधुदुर्ग 1 एनडीआरएफ पथक
गडचिरोली 1 एनडीआरएफ पथक
एकूण 14 एनडीआरएफ पथकं तैनात
नांदेड 1 एसडीआरएफ पथक
गडचिरोली 2 एसडीआरएफ पथकं
नाशिक 1 एसडीआरएफ पथक
भंडारा 1 एसडीआरएफ पथक
नागपूर 1 एसडीआरएफ पथक
एकूण 6 एसडीआरएफ पथकं तैनात