Maharashtra Rain Update LIVE : आज कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Update LIVE : भारतीय हवामान विभागानुसार (IMD) येणारे 4 ते 5 दिवस राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात येतोय

Background
Maharashtra Rain : मागील काही दिवसांमध्ये मुंबई(Mumbai) , कोकणासह (Konkan) राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा पाहायला मिळाला, मात्र भारतीय हवामान विभागानुसार (IMD) येणारे 4 ते 5 दिवस राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात येतोय. दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाडा भागात आज 12 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज 12 आणि उद्या 13 सप्टेंबर हे तीन दिवस सतर्कता बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाने केलंय.पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता राज्यातील मच्छिमारांना पुढचे काही दिवस मासेमारीसाठी अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. पुढील पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता : हवामान विभाग
Maharashtra : येलदरी धरणाचे 2 दरवाजे उघडले
Maharashtra : मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण असलेल्या परभणीच्या येलदरी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत या दोन दरवाजांमधून 4424 तर विद्युत प्रकल्पातुन 1800 क्युसेक्स असा एकुण 6224 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.महत्वाचे म्हणजे 2013 ते 19 सलग 6 वर्ष धरण भरले नाही परंतु 2019 ते 2022 सलग 4 वर्ष धरणं 100 टक्के भरून पाणी सोडण्याचा यंदा विक्रम झाला आहे. धरण बांधल्यापासून आजतागायत पहिल्यांदाच सलग 4 वर्ष येलदरी भरले आहे. यंदा ही धरण भरल्याने परभणी,हिंगोली, नांदेड, वसमत,पुर्णा या 5 प्रमुख शहरासह 200 खेड्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे तसेच जवळपास 60 हजार हेक्टर वरील शेतीपिकांना यांचा फायदा होणार आहे.























