एक्स्प्लोर

Maharashtra Rain News : सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात कोसळणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस, देशात पावसासाठी पोषक वातावरण

सप्टेंबर महिन्यात पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळणार असून, शेवटच्या टप्प्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (109 टक्के) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Rain News : राज्यात पुन्हा एकदा पावसानं (Rain) जोर धरला आहे. कालपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. विशेषत: नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात जोराचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळणार असून, शेवटच्या टप्प्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (109 टक्के) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यामध्ये काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. देशाचा पूर्वोत्तर भाग आणि पश्चिम-उत्तर राज्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. प्रशांत महासागरात ‘ला नीना’ स्थिती कायम आहे. अशा वातावरणात सरासरीच्या तुलनेत 103 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागात दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या जवळ किंवा त्यापेक्षाही कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण कमी राहणाऱ्या उत्तर-पश्चिम भागासह दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये काही भागातच तापमानात वाढ दिसून येईल.

अतिवृष्टी कुठे होणार?

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांत या महिन्यात अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, देशाच्या तीस ते चाळीस टक्के भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पन्नास टक्के भागांत सरासरीनुसार पाऊस होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस : माणिकराव खुळे

सप्टेंबर महिन्यात कसा पाऊस असेल. तापमानाची स्थिती काय राहिल यांसदर्भातील माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मराठवाड्यातील औरंगाबाद सोडून सर्व जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर आणि विदर्भातील अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस म्हणजे 109 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस. वरील जिल्ह्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात म्हणजे संपूर्ण खान्देश, अहमदनगर, सांगली, नागपूर, भंडारा  आणि गोंदिया हे जिल्हे आणि दक्षिण नाशिक व उत्तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, नांदगाव, येवला, वैजापूर ते सिल्लोड पर्यंत तालुक्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतू प्रॉबबिलिटीच्या भाषेत बोलायचे झाल्यास ही शक्यता थोडी कमी म्हणजे ४० टक्के जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
 
परतीचा प्रवास कधी?

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानमधून पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होण्याचे संकेत हवामान विभागाने गेल्या आठवड्यात दिले होते. मात्र, सध्या तरी पावसाच्या परतीच्या प्रवासाबाबतची स्थिती तयार झालेली नाही. त्याबाबतची स्थिती दिसून येताच, ती जाहीर केली जाईल, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde:  सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget