(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain Update : अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा राज्याला जोरदार फटका
Maharashtra Rain Update : राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि इतर ठिकाणी सुरु असलेल्या पावसाची प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगवर.
LIVE
Background
Maharashtra Rain Update : हवामान विभागाकडून राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाकडून राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. सोबतच वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादेत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात आजसाठी चारही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. ह्या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापसाचं नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसू शकतो.
बुलढाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून आज सकाळी पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वच नदी ओढ्याना पूर आलेला आहे. शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. अनेक प्रकल्प पूर्ण भरले असून काही प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे.
मराठवाड्यात भीषण पाऊस सुरु
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचं रौद्ररूप पहायला मिळत असून सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. मांजरा नदीच्या पुरात 17 जण अडकले असून बचाव कार्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे. इतर ठिकाणीही अनेकांच्या घरात घुसले पाणी. नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या दोन्ही विभागातील सात जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. ज्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यातआला आहे. मुंबई, पुणे, औरंगाबादसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अशात ह्या भागात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज असेल. दुसरीकडे, अरबी समुद्रात देखील वाऱ्यांचा वेगअधिक असल्यानं मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा राज्याला जोरदार फटका
अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा राज्याला जोरदार फटका. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुरामुळे एकूण 13 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी नाशिक 1, जालना 1, बीड 2, उस्मानाबाद 2, परभणी 2, लातूर 1, बुलढाणा 1, यवतमाळ 3 मृत्यू झाले आहेत. तर 4 जण जखमी झाले आहेत. 205 जनावरांचे या पुरात मृत्यू झाले आहेत. एनडीआरएफ एअर फोर्सची एक तुकडी कार्यरत आहे तर एका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत कार्य सुरु आहे.
नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात
नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात. मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीर चक्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता.
वैजापूरच्या बोरसरच्या भिंगी गावात एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलीय
वैजापूरच्या बोरसरच्या भिंगी गावात एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलीय. तलाव फुटल्याने बोरसरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. याचं प्रवाहात एक मनोरुग्ण महिला वाहून गेली.
उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथे आज हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांचे रस्क्यू
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे काही ठिकाणी लोक अडकले होते. आज सकाळपासून एकवीस लोकांना वेगवेगळ्या यंत्रणांनी रेस्क्यु ऑपरेशन करून त्यांचे सुटका केली. उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथेही आज हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. या हेलिकॉप्टरचा वापर करून दावतपुर गावातून पाच सहा जणांची सुटका करण्यात आली. यासाठी संरक्षण विभागात हेलिकॉप्टर वापरण्यात आलं होतं. दाऊतपुरला चारही बाजूनं नदीपात्राच्या पाण्याने वेढल्यामुळे हे लोक शेतामध्ये अडकले होते.
मराठवाड्यात पुरामुळे हाहाःकार, 35 जणांचा मृत्यू, 4 ते 5 हजार जनावरं गेली वाहून
मराठवाड्यात पुरामुळे हाहाःकार, 35 जणांचा मृत्यू, 4 ते 5 हजार जनावरं गेली वाहून, 20 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती