एक्स्प्लोर

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, मुंबईत वाहतुकीवर परिणाम

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  

LIVE

Key Events
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, मुंबईत वाहतुकीवर परिणाम

Background

Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच रेल्वेची वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. तसेच  पुणे, सिंधुदुर्ग, अहमदनगर, नाशिक, लातूर, परभणी आणि नांदडेमध्येही पावसानं हजेरी लावली. दरम्यान, आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच मुंबई ठाणे परीसरातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आज कोकणात पावसाचा ऑरेंज  अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट म्हणजे नेमकं काय?

कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस असेल त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून दिला जातो.  ऑरेंज अलर्टमध्ये, रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते.  ऑरेंज अलर्टचा अर्थ त्या भागात कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.

महिन्याभराच्या विश्रांतीनंतर नांदेडमध्ये पावसाचे आगमन

तब्बल महिन्याभराच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. विजांच्या गडगडाटासह जिल्हाभरात पावसानं चांगलीच हजेरी लावली.  नांदेड जिल्ह्यात जून ते जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत जोरदार पाऊस झाला. जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जिल्हाभरात जोरदार अतिवृष्टी झाली. दरम्यान या दोन महिन्यात नांदेड जिल्ह्यात तब्बल 850 मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली व जिल्हा भरातील छोटेमोठे 36 प्रकल्प तुडुंब भरले. पण त्यानंतर पावसाने उघडीप घेत तब्बल एक महिना दडी मारली. ज्यामुळे बहरात आलेली सोयाबीन, उडीद, मूग, कापूस ही पिके अक्षरशः वाळून गेली. आता एक महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्हाभरात पावसाचे आगमन झाले आहे. 

12:32 PM (IST)  •  09 Sep 2022

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, खरीप पिकांना जलसमाधी

Latur Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. काही ठिकाणी या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, लातूर (Latur) जिल्ह्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं खरीप पिकांना जलसमाधी मिळाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तब्बल तीन तास सुरु असलेल्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी केलं आहे.

12:30 PM (IST)  •  09 Sep 2022

सावधान! चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ

Chandrabhaga River : आज राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी प्रशासनानं बाप्पाच्या विसर्जनाची तयारी केली आहे. मात्र, पंढरपूरमध्ये (Pandharpur) गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तयारी केली नाही. त्यामुळं चंद्रभागा नदीत (Chandrabhaga River) गणपती बाप्पाचं विसर्जन करताना नागरिकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे. कारण चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या ही नदी दुथडी भरुन वाहत आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Best Bus Driver Viral Video : धक्कादायक! बस थांबवून दारू घेतली.. BEST बस चालकाचा प्रताप FULL VIDEOZero Hour  INDIA Alliance Leadership : इंडिया आघाडीतील संघर्षाचा मविआवर परिणाम?ABP Majha Headlines : 11 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Priyanka Chaturvedi : इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वाच्या मुद्द्यावर ठाकरे कुणाच्या बाजूने?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
Embed widget