एक्स्प्लोर

Maharashtra Rain Live Updates : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात

Maharashtra Rain Live : राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. आजही राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Rain Live Updates : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात

Background

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. या पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे. त्यामुळं शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यात मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. तसेच अमरावती जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, आजही राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (8 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगली हजेरी लावली आहे. लांबलेल्या पावसामुळं खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळं पिकांनी जीवदान मिळालं आहे. दरम्यान, 

सिंधुदुर्ग पाऊस

सिंधुदुर्ग  जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वारा आणि गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, वैभववाडी, कुडाळ, दोडामार्ग भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर अरबी समुद्रात वादळ सदृढ परिस्थिती निर्माण झाली आहे. ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस 

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी खुर्द गावात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. यामुळं लोणी-संगमनेर रस्ता जलमय झाला आहे. रस्त्यांना नदीचे ‌स्वरुप, तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानातही पाणी शिरले आहे. गावातील माणिकनगरमध्ये पाणी घुसले आहे. जनावरांच्या बाजाराजवळील भीमनगरमध्येही पाणी शिरलं आहे. 

अमरावती जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. अचलपूर-परतवाडा शहरासह तालुक्यात दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली. 

 

18:14 PM (IST)  •  07 Sep 2022

Nagpur Heavy Rain : नागपुरात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात

नागपूरः दिवसभराच्या दमट वातावरणानंतर नागपुरात सायंकाळी सहाच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

#Rain #NagpurRain #Lightning #Heavyrainfall

17:00 PM (IST)  •  07 Sep 2022

Mumbai Rain :  मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात

Mumbai Rain :  मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. 

16:57 PM (IST)  •  07 Sep 2022

पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

Pune Rain: पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.  दुपारपासून पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यातील पावसामुळे गणपती दर्शनाला आलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील पाच मानाच्या आणि काही महत्वाच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे. अशातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्यांच्या दौऱ्यात विलंब होताना दिसत आहे. सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण होतं. मात्र दुपारपासून पुण्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. लहान मोठ्या गणेश मंडळांना देखील पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

12:24 PM (IST)  •  07 Sep 2022

लातूर जिल्ह्यात घोड्यासह महिला गेली वाहून, दोन्ही मृतदेह सापडले

Latur Rain : लातूर जिल्ह्यात घोड्यासह महिला वाहून गेल्याची घटना घडली. ओढ्याच्या पाण्यात महिला आणि घोडा वाहून गेले होते. दोन्ही मृतदेह सापडले आहेत. निलंगा तालुक्यातील हलगरा इथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. मागील दोन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील तुफान पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील 10 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. निलंगा तालुक्यात देखील सोमवारी जोरदार पाऊस झाला होता. हलगरा येथील महिला शेतकरी परिवीनबी उर्फ बाई पाशामियाँ शेख (वय ३२ वर्षे ) या आपल्या शेताकडून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी वाटेतील ओढ्याच्या पाण्यातून त्यांना जावे लागले. घोडा हातात धरुन त्या ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. घोड्यासह त्या पाण्यात वाहून गेल्या. रात्री त्या घरी आल्या नाहीत म्हणून नातेवाईकांनी शोधा शोध सुरु केली. ओढ्याचे पाणी ओसरल्यावर महिलेचा मृतदेह पाचशे मीटर अंतरावर झाडाला अडकलेल्या अवस्थेत दिसून आला तर घोड्याचा मृतदेह ही बाजूला सापडला. औराद  शाहजनी पोलिसांनी सदरील घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यास हलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठाविला आहे.

10:39 AM (IST)  •  07 Sep 2022

बारामतीच्या पश्चिम भागात ढगफुटी सदृश पाऊस, शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता

Baramati Rain : पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) तालुक्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली. बारामतीमधील पश्चिम भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं असून, पिकांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, नीरा-बारामती रस्त्यावरील पूल ओढ्याच्या पुराच्या पाण्याखाली गेला असून, हलक्या वाहनांची वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाहीVaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Yuzvendra Chahal : लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Embed widget