Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान

Maharashtra Rain :  राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

abp majha web team Last Updated: 21 Jul 2022 11:36 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भात पावसानं...More

साताऱ्यातील भांबवली गावाकडं जाणाऱ्या रस्त्यावर कोसळली दरड, दोन वृद्ध आजोबांनी रस्ता केला मोकळा

Satara rain : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जो काही जोरदार पाऊस कोसळला आहे, त्यामुळे या ठिकाणी दरडी कोसळू लागल्या आहेत. कास शेजारील भांबवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही दिवसापूर्वी दरड कोसळली होती. यामुळं भांबवली गाव आणि वजराई धबधब्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. दरड कोसळली असल्यानं या रस्त्यावरुन ये जा करताना ग्रामस्थ आणि पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जाव लागत होतं. ग्रामस्थ आणि पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन दोन वयोवृद्ध नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहताच ही दरड हटवून रस्ता मोकळा केला आहे. 65 वर्षाचे चंद्रकांत मोरे आणि पन्नास वर्षाचे बळीराम सपकाळ यांनी स्वतः हातात कुदळ आणि फावडे घेऊन भर पावसात मेहनत घेऊन ही दरड बाजूला केली. या दोन्ही आजोबांनी केलेल्या या कामाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे. या दोन्ही आजोबांची प्रेरणा घेऊन शासकीय यंत्रणेने देखील अशाच प्रकारचे तत्परतेने काम करण्याची गरज असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.