Manoj Jarange Patil : बीड जिल्हा हा पवित्र आहे. मात्र धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या टोळीने वाईट बघण्याची वेळ आणली आहे. एका जागेवर बसून तुम्ही खंडणी आणि खून करायचा कट शिजवायला लागले आहे. एका मंत्राच्या सपोर्टने तुम्ही अनेक वेळा टोळ्या चालवल्या. मात्र खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकले पाहिजे. अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarang) हल्लाबोल केला आहे. तर ही धनंजय मुंडेची टोळी आहे, तिचा नायनाट होणे गरजेचे आहे. असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना करत मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.
वाल्मिक कराड (Walmik Karad), सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) आणि प्रतीक घुले (Pratik Ghule) यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज आज समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचेच हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे समोर आलं आहे. या विषयी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
.... तर देशमुख कुटुंबाला धोका
मुख्यमंत्र्यांना माझे एक सांगणे आहे की, फोन आणि खंडणी मधील जे फरार आरोपी आहेत ते कोणाशी बोलले यांचे CDR काढावे. तर जे आरोपी पळून गेले त्यांना सांभाळले कुणी? पैसा कोणी पुरवला? हे कोण यांना सह आरोपी केलं पाहिजे. ही धनंजय मुंडेची टोळी आहे, तिचा नायनाट होणे गरजेचे आहे. आता कुणालाही सोडता येणार नाही. मुख्यमंत्र्यांना या निमित्याने आमचे सांगणे आहे की, यात कुणाचाही जामीन झाला नाही पाहिजे. त्यांचा जामीन झाला तर देशमुख कुटुंबाला धोका आहे. समोर व्हिडिओ येत असेल तर मुख्यमंत्र्यांना हे चॅलेंज आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या टोळ्यांचा सुपडा साफ करणे गरजेचे आहे. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
ही प्रॉपर्टी सरकारमधील मंत्र्याची आहे
एक माणूस राज्य चालवत नाही. नाहीतर तुमच्यावरचा देखील विश्वास उडेल. ही प्रॉपर्टी सरकारमधील मंत्र्याची आहे. सध्या सीआयडी एसआयटी आणि बीड जिल्ह्याचे पोलीस प्रशासन योग्य ट्रक वर काम करत आहे. ज्या दिवशी आम्हाला कळेल तुम्ही चार्जशीटमध्ये फेरफार करत असाल, आरोपींना पाठीशी घालत असाल तर ते योग्य होणार नाही. आता ईडी कुठे आहे? ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्यांना आत टाकले पाहिजे. खंडणी आणि खुनातील आरोपी एकच आहेत, ते सुटता कामा नये. त्यांच्यावर 302 लावा आणि संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्या टोळीलाही जेरबंद करा, अशी मागणी ही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या