Nana Patole : अजित पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय? नाना पटोले म्हणतात...
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले.
Nana Patole on Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी माझी फार काही चर्चा होत नाही. माझी चर्चा ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशी होते. त्यामुळं त्यांच्या मनात नेमकं काय आहे? हे मला माहीत नसल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. पण अजित पवार असं वेगळं काही करतील असे वाटत नसल्याचे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले आज एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते.
अजित पवार असं काही करणार नाहीत
अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं होतं. यावर बोलताना पटोले म्हणाले की, अजित पवार असं काही करणार नाहीत हा आमचा आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. भाजपविरोधी जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. ही वैचारीक लढाई असल्याचे पटोले म्हणाले. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात जी भूमिका मांडली ती अंगावर काटा आणणारी आहे. आज देश धोक्यात आला आहे. देशाची सुरक्षा धोक्यात असल्याचे पटोले म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेसने खूप कष्ट सहन केलं आहे. जनतेच्या कोर्टात भाजप नापास झाली असल्याचे नाना पटोले म्हणाले.
प्रफुल्ल पटेल सध्या कुठे आहेत ते माहित नाही
अजित पवार यांच्याशी जास्त चर्चा होता नाही. जयंत पाटील यांच्याशी माझी चर्चा होते. जयंत पाटलांचे काय चालले आहे हे विचारले असते तर मी सांगतिले असते असे पटोले म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हल्ली मला भेटत नाही. ते सध्या कुठे आहेत ते माहित नाही. ते तुम्हाला तरी दिसतात का? असे नाना पटोले म्हणाले. त्यांचे सध्या काय चालले ते माहित नसल्याचे पटोले म्हणाले.
...तातडीने करावई करणार
महाराष्ट्र हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा आहे. काँग्रेसने त्याचे पालन केले आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. येणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत भाजपसोबत जर कोणी अलायन्स केलं तर मी तातडीने करावई करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. ही वैचारीक लढाई आहे. सत्तेसाठी कोणीही काहीही केलं तर खपवून घेतलं जाणार नाही. काँग्रेसबद्दल लोकांचा विश्वास वाढत आहे. सध्या काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची पडझड नसल्याचे पटोले म्हणाले. लोकांचा विश्वास संपादन करणे महत्वाचे आहे. जनतेचा विश्वास काँग्रेसवर वाढत असल्याचं पटोलेंनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: