एक्स्प्लोर

BMC ॲाडिटवरुन सामंत-नाईकांमध्ये खडाजंगी; सामंत जिकडे सत्ता तिकडे जातात, त्यांना सत्तेची चाहुल लागते; वैभव नाईकांनी थेट फटकारलं

Uday Samant vs Vaibhav Naik: बीएमसीमध्ये एखादी चौकशी झाली की, ठाकरेंच्या विरोधातच होईल, असं म्हणणं चुकीचं आहे, असं उदय सामंत म्हणाले. तर बीएमसी ज्यांच्या अखत्यारित आहे, त्या नगरविकास खात्याचीही चौकशी करा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केली आहे.

Maharashtra Politics: मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) गेल्या 25 वर्षांच्या आर्थिक व्यवहारांचं ऑडिट होणार आहे. यासाठी तीन सदस्यीय समिती गठित करणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली. याच मुद्द्यावरुन उदय सामंत आणि वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यात विधीमंडळ परिसरात खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, अधिवेशनात भाजप आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागणीवर बोलताना यासंदर्भात मागणी केलेली. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात घोषणा केली. 

बीएमसीमध्ये एखादी चौकशी झाली की, ठाकरेंच्या विरोधातच होईल, असं म्हणणं चुकीचं आहे, असं उदय सामंत म्हणाले. तर बीएमसी ज्यांच्या अखत्यारित आहे, त्या नगरविकास खात्याचीही चौकशी करा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केली आहे. दरम्यान, नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात भाजप आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागणीवर बोलताना यासंदर्भात मागणी केलेली. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या मागील 25 वर्षातील अर्थिक व्यवहारांचं ऑडिट होणार आहे. यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करत असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. 

उदय सामंत विरुद्ध वैभव नाईक यांच्यात विधीमंडळ परिसरात खडाजंगी

दोन्ही नेत्यांनी विधीमंडळ परिसरात बोलताना एकमेकांवर टीकास्त्र डागली. दोघांचीही खडाजंदी एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ॲाडिटवरून मंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्यात खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळालं. 

कोण-कोणास काय म्हणालं? 

मंत्री उदय सामंत : एखाद्या गोष्टीची चौकशी करणं वेगळं आणि ऑडिट करणं वेगळं. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मुंबई महापालिकेचा निर्णय घेतला म्हणजे ठाकरेंच्या विरोधात असा नाही आणि आम्ही फक्त ॲाडिट करणं म्हणजे, ठाकरेंना इशारा असं नाही. मला विंधीमंडळात प्रश्न आला तेव्हा मी त्यावर उत्तर दिलं, जे काही असेल ते समोर येईल. 

वैभव नाईक : यापूर्वीही चौकशी करण्याची भिती अनेकदा दाखवण्यात आली आहे. अधिवेशन आलं की, मागण्या जोर धरतात आणि त्यानंतर मागण्या थंडावतात. एकदाचं काय ती चौकशी करा, आम्ही तयार आहोत, पण आम्ही घाबरणार नाही, चौकशा लावण्यापेक्षा निवडणुकाच लावा

उदय सामंत : वैभव नाईक माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांना एकच सांगतो आम्ही 2024 पासून ते 2034 पर्यंत जिंकतच जाणार 

वैभव नाईक : सामंत साहेब जिकडे सत्ता तिकडे जातात, त्यांना सत्तेची चाहुल लागते त्यामुळे त्यांना जास्त कळतं 

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेनेची 25 वर्ष सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचा ऑडिट करण्याची मागणी होत आहे. मागील 25 वर्षात  मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून कायम करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेत 8 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यानच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून करण्यात आली होती. या सगळ्या अहवालामध्ये पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असे ताशेरे कॅगने आपल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या एकूण कारभारावर मारले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी  हा फक्त ट्रेलर असल्याचं  सांगून खरा पिक्चर बाकी असल्याचं म्हटलं  होतं.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
Embed widget