एक्स्प्लोर

Pune Bypoll Uddhav Thackeray : भाजपने टिळक कुटुंबाला वापरून फेकून दिलं; उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्ला

Pune Bypoll Uddhav Thackeray : भाजपच्या पाशवी पकडीपासून सुटका करण्याची मोहीम पिंपरी-चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीपासून करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Pune Bypoll Uddhav Thackeray :  भाजपने आतापर्यंत वापरा आणि फेकून द्या असेच धोरण अवलंबले आहे. मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर भाजपने (BJP) टिळक कुटु्ंबीयांना वापरून फेकून दिले असल्याचा घणाघाती हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. कसबा (Kasaba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी त्यांनी मतदारांना ऑनलाईन पद्धतीने संबोधित केले. यावेळी भाजपला कोणतीही सहानुभूती दाखवण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. भाजपची पाशवी पकड दूर फेकण्याची सुरुवात या पोटनिवडणुकीपासून करण्याचे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी राज्यात मध्यावधी निवडणूका जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले. 

भाजपला सहानुभूती दाखवण्याची गरज नाही

पुण्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत आहे. तर, दुसरीकडे शिवसेना-शिंदे गट
 आणि भाजप युतीचे उमेदवार आहेत. प्रचारात दोन्ही बाजूचे अनेक दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. त्यातच आज, उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने मतदारांशी संवाद साधला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, शिवसेनेची लढाई सुरू आहे. यामध्ये आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळत आहे. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत आहोत. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे निधन ही दुर्देवी घटना असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. भाजपने टिळक कुटुंबातील सदस्यांना तिकीट का नाकारली, असा प्रश्न त्यांनी केला. भाजपने फक्त त्यांचा वापर केला. खासदार गिरीश बापट यांची प्रकृती सध्या चांगली नाही. तरीदेखील त्यांना गंभीर अवस्थेत प्रचार करण्यास भाग पाडले जात आहे. हा प्रकार दु्र्देवी नाही का, असा प्रश्न त्यांनी ठाकरे यांनी केला. भाजप नेत्यांकडून असे दुर्देवी प्रकार सुरू असताना दुसरीकडे त्यांना सहानुभूती दाखवण्याची काही गरज नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांना साथ देणार का?

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, कोल्हापूर पोटनिवडणुकीत आणि आताही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणार का असा प्रश्न केला जात आहे. आम्ही या आधी 25 वर्ष भाजपला मतदान करतच होतो असे सांगत भाजपकडून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. तुमचा वापर करून पाशवी पकड मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. आमच्यासोबत आलात तर तुम्ही चांगले आणि आमच्या विरोधात गेलात तर तुरुंगात जाल हे भाजपचे धोरण आहे. आमच्याविरोधात गेलात तर चौकशी आणि भाजपसोबत आले तर स्वच्छ कारभार असा ठसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या काही नेत्यांनी स्वपक्षीय नेत्यांनादेखील सोडले नाही. त्यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावला असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. ही चुकीची वृत्ती गाडायची असून पिंपरी आणि चिंचवडपासून सुरू करायला हवी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विजयी करावेच लागेल असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Rajyasabha Election 2026: तावडे, पाटील, कराड...राज्यसभेसाठी भाजपकडून कोणाच्या नावाची चर्चा?; 5 नावं आली समोर
तावडे, पाटील, कराड...राज्यसभेसाठी भाजपकडून कोणाच्या नावाची चर्चा?; 5 नावं आली समोर
Bhiwandi Mayor Election 2026: महायुतीमध्ये फूट, काँग्रेस नगरसेवकांना महापौर पदासाठी भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे पक्षादेश, भिवंडी महापालिकेसाठी राजकीय हालचालींना वेग
महायुतीमध्ये फूट, काँग्रेस नगरसेवकांना महापौर पदासाठी भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे पक्षादेश, भिवंडी महापालिकेसाठी राजकीय हालचालींना वेग
Rohit Pawar on Radhakrishna Vikhe Patil: विखे-पाटलांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही; रोहित पवारांचं सडेतोड उत्तर
विखे-पाटलांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही; रोहित पवारांचं सडेतोड उत्तर

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Municipal Corporation: दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
Mantralaya Bribery Sting Operation: '50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
'50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
Abhishek Sharma Jersey T20 World Cup 2026: पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप
मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा NCERT नं एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर मुधोजीराजेंचा आरोप
T20 WC 2026 Ind vs Ned Abhishek Sharma: आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
Shani Transit 2026: शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
Embed widget