एक्स्प्लोर

Ajit Pawar : स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा; अजित पवार यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Ajit Pawar : आपले स्वत: चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी राज्य सरकारकडून पानभर जाहिराती दिल्या जात असल्याची बोचरी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Ajit Pawar :  राज्यातील शेतकरी संकटात असताना दुसरीकडे स्वत: सरकार स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा करत असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Assembly Session) सरकारला विविध मुद्यांवर घेरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. आज, विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार घालत असल्याची घोषणा त्यांनी केली. विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राज्यपाल बैस यांची भेट घेणार आहे 

सोमवारपासून, राज्याचे  अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी आज, विरोधी पक्षांनी आज अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली. 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फिरत असताना लोकांनी आपली कैफियत मांडली. शेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर केलेली मदत अद्यापही  मिळाली नाही. शेतकरी आत्महत्येत वाढ होत असल्याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. 

वाढत्या महागाईमुळे शेती उत्पादन खर्च वाढला आहे. पण त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूरमधील शेतकऱ्याला कांदा विक्री केल्यानंतर अवघ्या दोन रुपयांचा चेक मिळाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्यांला चांगला भाव सरकारने जाहीर करून निर्यात वाढवण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. आपला कांदा परदेशात गेला पाहिजे आणि सरकारला 

विरोधकांची मुस्कटदाबी?

पवार यांनी या पत्रकार परिषदेत, विरोधी पक्षनेत्यांविरोधात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला, जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. आदित्य ठाकरे यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, या गोष्टीचे सरकारला गांभीर्य नाही का, असा सवाल पवार यांनी केला. ठाकरे गटाच्या आमदारांवर एसीबीच्या माध्यमातून चौकशी लावली जात आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर छापे मारले जात असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. 

मग त्या एका आमदाराचा मनसे पक्ष होणार का?

उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्षाचे नाव  आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा पक्षपातीपणाचा असल्याची भावना लोकांमध्ये असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. 40 आमदार एका बाजूला असल्याने त्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. उद्या मनसेचा एक आमदार आहे. उद्या त्या आमदाराने पक्षावर दावा केल्यास त्यांचा पक्ष होणार का, असा प्रश्नही पवार यांनी केला. 

जिल्हा वार्षिक योजनेचे पैसे खर्च झालेले नाहीत. सरकारचं याकडे अजिबात लक्ष नाही. जिल्हा नियोजन समिती मधुन जी कामे होणे अपेक्षित होते मात्र ते झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे

जाहिरातींवर 50 कोटी सरकारने खर्च केले आणि मुंबई महापालिकेने 17 कोटी रुपये सरकारने जाहिरातींवर खर्च केले आहेत. आपले हसरे चेहरे दाखवण्यासाठी ही उधळपट्टी सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नाही आणि दुसरीकडे महामंडळाच्या पानभर जाहिराती प्रसिद्ध होत आहे. हा प्रकार चिड आणणारा असल्याचे पवार यांनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पाBhaskar Jadhav On Nana Patole :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget