एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal: ना अजित पवार, ना सुनील तटकरे, पवारांच्या भेटीला जाताना भुजबळांनी कुणाला सांगितलं?

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यांनी दीड तास पवारांशी चर्चा केली. या भेटीविषयी छगन भुजबळांनी कोणाला माहिती दिली होती ते त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

मुंबई: आज राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीसाठी सिल्व्हर ओकवरती दाखल झाले. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये भेट झाली या भेटवेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. तर शरद पवार यांना भेटण्याआधी त्यांनी पक्षातील कोणत्या नेत्याला याबाबत कल्पना दिली होती का या प्रश्नावर बोलताना भुजबळांनी मी राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं असल्याचं म्हटलं आहे. 

भुजबळ पुढे म्हणाले, "मी निघताना घरून निघताना प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्याशी चर्चा केली होती. मी शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटायला जात आहे. माझ्याजवळ असलेली कागदपत्रे त्यांना देणार आहे, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मला जा असं सांगितलं". 

सिल्व्हर ओकवरील भेटीत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? 

गरिबांची घरं पेटता कामा नये. एकमेकांच्या जीवावर कोणी उठता कामा नये. हाच माझा हेतू आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शरद पवारही म्हणाले की, आम्ही याच्यात राजकारण आणणार नाही. केवळ एक सामाजिक प्रश्न म्हणून दोन-चार लोकांबरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा हे बघुया, असे मला शरद पवार यांनी सांगितले. 

राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही शांततेसाठी काम केलं पाहिजे, असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की जरांगे हे मुख्यमंत्र्यांशी  भेटले. पण मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या भेटीला गेले होते तुम्ही त्यांना काय आश्वासन दिलं, हे मला माहिती नाही. तुम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे.  

आमची दीड तास चर्चा झाली- छगन भुजबळ

छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या या भेटीत दीड तास चर्चा झाली. या भेटीमध्ये ओबीसी आरक्षणासह धनगर आरक्षणावरही चर्चा झाली. सर्व समाजाच्या आरक्षण प्रश्नावर चर्चा झाली. सर्व प्रश्नावर साधक बाधक चर्चा झाली. शरद पवार चर्चेसाठी तयार झालेत, दोन चार लोकांना ते बोलावतील किंवा मी येतो असं ते म्हणाले. ओपनमध्ये चर्चा होणं कठीण दिसतं, त्याला राजकारणाचा वास लागतो आणि प्रश्न सुटण्याऐवजी वाढत जातो. त्यामुळे याबाबत काय करता येईल, काय पावलं उचलायला हवी हे कळून येईल असंही पुढे छगन भुजबळ म्हणाले आहेत. 

VIDEO :  छगन भुजबळ आणि शरद पवार भेटीत नेमकं काय घडलं?

संबधित बातम्या - Chhagan Bhujbal: शरद पवारांच्या बिछान्याशेजारी खुर्ची टाकून मराठा- ओबीसी आरक्षणावर चर्चा, भुजबळांनी सांगितली खोलीतील Inside स्टोरी

दीड तासांची भेट, बिछान्यावर बसून चर्चा, शरद पवार नेमकं काय म्हणाले, छगन भुजबळांचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
ट्रेनी अग्निवीर बनला दरोडेखोर, मित्र अन् कुटुंबाच्या साथीनं ज्वेलर्सवर दरोडा, 50 लाखांच्या सोनं चांदीची लूट Video
बंदूक अन् चाकूचा धाक दाखवला, ट्रेनी अग्निवीरानं 50 लाखांचा दरोडा टाकला, मध्य प्रदेशात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 19 August 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07:00PM : 19 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPorsche Car Accident Update : पोर्शे अपघातातील कार अगरवाल कुटुंबियांना परत मिळणार ?Raksha Bandhan Special : शिंदे, ठाकरे ते मुंडे भावंड; नेते मंडळींकूडन रक्षाबंधन Superfast News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
ट्रेनी अग्निवीर बनला दरोडेखोर, मित्र अन् कुटुंबाच्या साथीनं ज्वेलर्सवर दरोडा, 50 लाखांच्या सोनं चांदीची लूट Video
बंदूक अन् चाकूचा धाक दाखवला, ट्रेनी अग्निवीरानं 50 लाखांचा दरोडा टाकला, मध्य प्रदेशात खळबळ
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना
अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून
अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून
भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपला, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी
भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपला, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी
टीका थांबवा नाहीतर तुमचे घोटाळे बाहेर काढू; रत्नागिरी भाजपचा रामदास कदमांना इशारा
टीका थांबवा नाहीतर तुमचे घोटाळे बाहेर काढू; रत्नागिरी भाजपचा रामदास कदमांना इशारा
Embed widget