Sharad Pawar : प्रतापराव पवारांच्या घरी अजित पवारांची भेट, वाचा शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या दोघांची आज पुण्यात भेट झाली. या भेटीनंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या दोघांची आज पुण्यात भेट झाली. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही भेट झाली. दिवाळी सणाच्या निमित्तानं स्नेहभोजनासाठी पवार कुटुंब एकत्र आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याभेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवार म्हणाले.
सगळ्यांची तब्बेत चांगली
राज्यातील जनतेला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांना सुखाची, आनंदाची जावो असे शरद पवार म्हणाले. प्रसारमाध्यमांनी अजित पावर आणि प्रतिभाताई पवार यांच्या तब्बेतीबद्दल विचारले. यावेळी शरद पवार म्हणाले की, सगळ्यांची तब्बेत चांगली असल्याचे शरद पवार म्हणाले. दरम्यान, आज शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात भेट झाल्यानंतर अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले आहे. दिल्लीत अजित पवार हे अमित शाह यांची भेट घेण्याची माहिती मिळत आहे.
भेट संपूर्णपणे कौटुंबिक : सरोज पाटील
राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार (Sharad Pawar Ajit Pawar meeting) यांची पुन्हा एकदा एकत्र भेट झाली आहे. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार (Pratap Pawar) यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त भेट झाली. पुण्यातील बाणेरमध्ये (Baner Pune) प्रतापराव पवार यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील बहुतेक सर्वजण उपस्थित होते. प्रताप पवार यांच्या पुण्यातील बाणेरमधील घरी शरद पवार गेले असताना, त्याठिकाणी अजित पवारदेखील याठिकाणी उपस्थित होते. शरद पवार हे त्यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त गेले होते. ही भेट संपूर्णपणे कौटुंबिक आहे, असं शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी एबीपी माझाला सांगितलं.
पवार कुटुंबियांनी काय करावे हे त्यांचा मुद्दा : जयंत पाटील
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारण्यात आले. यावेळी जयंत पाटील यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. पवार कुटुंबियांनी काय करावे हे त्यांचा मुद्दा आहे. त्याबद्दल मी काय बोलणार? मी पार्टीचा प्रदेश अध्यक्ष आहे. पार्टीबद्दल काही असेल तर बोला. कोणी कोणाला भेटावे याबद्दल मी काय बोलू, असं जयंत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: