दादा म्हणाले कांदा निर्यातबंदीचा निर्णय चुकला, पण तुम्ही भाजपसोबत गेलात तोच निर्णय चुकला, रोहित पवारांची बार्शीत टोलेबाजी
कांदा निर्यातबंदीचा (Onion Export) सरकारचा निर्णय चुकीचा होता असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं. पण दादा तुम्ही सरकारमध्ये गेलात तोच निर्णय चुकल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.
![दादा म्हणाले कांदा निर्यातबंदीचा निर्णय चुकला, पण तुम्ही भाजपसोबत गेलात तोच निर्णय चुकला, रोहित पवारांची बार्शीत टोलेबाजी Maharashtra politicis news NCP Mla Rohit Pawar comment on DCM Ajit Pawar in barshi solapur दादा म्हणाले कांदा निर्यातबंदीचा निर्णय चुकला, पण तुम्ही भाजपसोबत गेलात तोच निर्णय चुकला, रोहित पवारांची बार्शीत टोलेबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/11/a04d4241e734bfceef65b599f0dd100b1723360794601339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rohit Pawar : कांदा निर्यातबंदीचा (Onion Export Ban) सरकारचा निर्णय चुकीचा होता असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं. पण दादा तुम्ही सध्या सरकारमध्ये आहेत. तुम्ही जर दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असते तर तुम्हाला मानलं असतं असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवारांना टोला लगावला. तुम्ही म्हणता सरकारचा निर्णय चुकला, पण दादा तुम्ही भाजपसोबत गेला तोच तुमचा निर्णय चुकल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं,
दोन महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार
दोन महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. कोणत्याही योजना बंद होणार नाहीत, योजनांची व्याप्ती आपण वाढवणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे नूतन खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहीत दादा पवार यांच्या उपस्थितीत शरद शेतकरी संवाद मेळाव्याच आयोजन केलं आहे. यावेळी रोहित पवार बोलत होते.
विधानसभेच्या निवडणुकीत देखील सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार
लोकसभेच्या निवडणुकीत (Loksabha Election) सत्ताधाऱ्यांना तुम्ही धडा शिकवला आहे, आता विधानसभेच्या निवडणुकीत (Vidhansabha Election) देखील तसाच धडा शिकवणार असल्याचे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी मोठा पैसा खर्च केला होता. मात्र, तरीदेखील राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या पाठिशी उभी राहिल्याचे रोहित पवार म्हणाले. राज्यातील अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. कोणत्याही प्रकारचा विकास सरकारनं केला नाही. फक्त सरकारमधील नेत्यांचा विकास झाला असल्याचे रोहित पवार म्हणाले. 50 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मी विधानसभेत दिले होते असंही रोहित पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
शेतकऱ्यांनी आता बीज बिल भरायचे नाही. मागचे थकलेले बिलही द्यायचे नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. कांदा निर्यात आता बंद करायची नाही. लोकसभेमध्ये जो झटका दिला, तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा. जो काम करतो तोच चुकतो, असे त्यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
गुलाबी बस अन् गुलाबी जॅकेट, अजित पवारांच्या 'जनसन्मान यात्रे'साठी मेगा प्लॅनिंग, आजपासून महाराष्ट्र पिंजून काढणार!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)