Shahaji Bapu Patil : नागपूरात शहाजी बापूंना मिळेना हॉटेल, मात्र आमदार निवासात राहणार सुरक्षा कर्मचारी! म्हणाले...
Shahaji Bapu Patil : गुवाहाटी (Guwahati) दौऱ्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेले शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) त्यांना सध्या तरी नागपूरमध्ये (Nagpur) हॉटेल मिळाले नाही
Shahaji Bapu Patil : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात झाली आहे. गुवाहाटी (Guwahati) दौऱ्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेले शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) त्यांना सध्या तरी नागपूरमध्ये (Nagpur) हॉटेल मिळाले नाही. आमदार निवास मिळाले आहे. मात्र तिथे त्यांचे सुरक्षा कर्मचारी राहणार आहे. असं ते म्हणाले.
"महापुरुषांविषयी यापुढे कोणीही बोलताना विचारपूर्वक बोलावे,"
महापुरूषांबाबत अपमानास्पद वक्तव्याचा सध्या देशभरात विरोध होतोय. यावर शहाजी बापूंचे मत विचारल्यावर ते म्हणाले, आता हा वाद लवकरात लवकर मिटवावा, महापुरुषांविषयी यापुढे कोणीही बोलताना विचारपूर्वक बोलावे, यामुळे लोकांच्या भावना दुखावता कामा नये असं ते म्हणाले.
शिंदे गटात काही खदखद नाही
शिंदे गटातील मंत्रीमंडळाच्या विस्तारावरून बच्चू कडूंची नाराजी आणि आमदारांमध्ये असलेली खदखद यावर शहाजी बापू म्हणाले, काही खदखद नाही. प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहे, सगळं चांगलं चाललंय. मंत्रीमंडळाचा विस्तार होणारच आहे. नशिबात असेल तर ते मिळेल, आमदार हे पद सुद्धा मोठं आहे. मिळालं तर त्याचा सदुपयोग करावा असं शहाजी बापू म्हणाले.
"काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल"
शहाजी बापू पाटील यांच्या "काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल" या वाक्यानं धुमाकूळ घातला. शहाजी बापूंच्या प्रत्येक डायलॉगबाजी वर कमेंट आणि लाईकचा पाऊस पडत होता. मात्र जुलै महिन्यात ते राहत असलेल्या मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील प्रकार घडला होता. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूम नंबर 312 मधील चेंबरच्या छताचा काही भाग कोसळल्याचे दिसून आले होते. गुवाहाटीत चकाचक हॉटेलमध्या राहून आल्यानंतर आमदार निवसस्थानातील बापूच्या रुमची अवस्था अतिशय दयनीय झाली होती
हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे पडसाद
गेल्या अनेक दिवसांपासून धगधगत असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे संतप्त पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले. खासदार तसेच महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांनाही बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार संतप्त झाले. अजित पवार यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा समाचार घेत असा कसा आदेश काढू शकतात? अशी विचारणा केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरून निवेदन दिले.