Radhakrishna Vikhe : '...तर मी राजकारणाचा संन्यास घेऊन टाकेन', राधाकृष्ण विखेंचे संजय राऊतांना चॅलेंज
Radhakrishna Vikhe : माझी बदनामी करणार असतील तर त्याचे परिणाम त्यांनी भोगायची तयारी ठेवावी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe : महानंद डेअरीच्या (Mahanand Dairy) चेअरमनसह 17 संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारची ही संस्था गुजरातकडे (Gujarat) जाणार असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर शेलक्या शब्दात हल्ला चढावला होता. विखेंच्या पाहुण्यांनी आणि मेहुण्यांनी प्लॅनिंग केले असून महानंद डेअरीची 50 एकर जमीन अदानीला विकण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी मंत्री विखे यांच्यावर केला होता. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला असून त्यांना मानसोपचाराची गरज आहे. असं विखे पाटील म्हणालेत.
राधाकृष्ण विखेंचे संजय राऊतांना चॅलेंज
विखे पाटील पुढे म्हणाले, 'अशी कुठली पन्नास एकर जमीन ते म्हणतात ती दाखवा आणि खरं म्हणजे त्यांचे विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार असून आज पर्यंत काही गोष्टींचे पथ्य आम्ही पाळतोय मात्र सवंग लोकप्रियतेसाठी असे आरोप करणार असतील, तसेच बदनामी करणार असतील तर त्याचे परिणाम त्यांनी भोगायची तयारी ठेवावी', त्यांनी त्यांच्या जीवनात काय व्यक्तिगत उद्योग केले कोणाचे घर उद्ध्वस्त केले, त्याचे नाव मला सांगावे लागतील, तुम्ही माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत मी राजकारणातून संन्यास घेऊन टाकील, असे चॅलेंज ही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.
संजय राऊतांना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिली तर चालेल का? - राधाकृष्ण विखे
संजय राऊत यांच्यासारखे सुपारी बाज लोक पिसाळलेला कुत्र्यासारखे अंगावर धावू लागले आहेत, अशी संतापजनक प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊत यांच्याबद्दल दिली आहे, राऊत यांच्या विधानावर मी भाष्य करणे आवश्यक नाही त्याला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका असं देखील विखे यांनी म्हटलंय.
संजय राऊत यांचा आरोप काय?
संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आरोप केले होते, ते म्हणाले होते महाराष्ट्र सरकारची एक डेअरी हे चालवू शकत नाहीत. स्वत:च्या डेअऱ्या बरोबर चालल्या आहेत. स्वतःच्या खोक्यांचे राजकारण बरोबर चालले आहे, महानंदचे चेअरमन कोण होते. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सख्खे मेहुणे. महानंद डेअरीमध्ये शेकडो कर्मचारी असून विखे पाटलांच्या पाहुण्यांनी आणि मेहुण्यांनी यावर भूमिका व्यक्त केली पाहिजे. असा टोला संजय राऊतांनी लगावला.
हेही वाचा>>>
मोठी बातमी : एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं, खासदार सून रक्षा खडसेंचं आवाहन, लोकसभेपूर्वी धमाका करणार?