एक्स्प्लोर

Navneet Rana : राणा दाम्पत्याच्या जामीनावर आज फैसला होणार? मुंबई सत्र न्यायालयात होणार सुनावणी

Navneet Rana : राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Navneet Rana : नवनीत राणा आणि रवी राणा दापंत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यासंबंधित जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमदार रवी राणा यांच्या विरोधात 17 केसेस आहे तर खासदार नवनीत राणांविरोधात 6 केसेस आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांचा या जामीनाला विरोध आहे. राणा दाम्पत्य बाहेर पडल्यावर पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, गुरुवारी राणा दाम्पत्यानं घरचं जेवण मिळण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. 

...त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

मुंबई सत्र न्यायालयाच्या व्यस्त कामकाजामुळे या प्रकरणी गेल्या सुनावणीतच स्पष्ट करण्यात आलं होतं की, शक्य झाल्यास आम्ही शुक्रवारी ही सुनावणी घेऊ. त्यानुसार, काल याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की, याचिकाकर्ते दाम्पत्य निवडून आलेले आमदार आणि खासदार आहेत. हे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी थोडा वेळ का होईना न्यायालयाला शक्य असल्यास ते युक्तीवाद करण्यास तयार आहेत. परंतु, न्यायालयाच्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाची प्रकरणंही सुनावणीसाठी आहेत. न्यायालयाकडे शुक्रवारी जराही वेळ नाही, असं न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात येणार आहे. 

आज दुपारी 12 वाजता ही सुनावणी

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याच्या जामिन याचिकेवर आज उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्यावतीनं राज्य सरकारला देण्यात आले होते. त्यानुसार, राज्य सरकारच्या वतीनं उत्तर दाखल करण्यात आलं. त्यानंतर आज दुपारी 12 वाजता ही सुनावणी घेण्याचं मुंबई सत्र न्यायालयानं निश्चित केलं आहे. जामीन याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारनं राणा दाम्पत्याच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे. राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्यानं आणि त्यांच्याविरोधात यापूर्वीही विविध पोलीस स्थानकांत इनेक गुन्हे दाखल असल्यानं त्यांना जामीन देण्यात येऊ नये, तसेच जामीनावर बाहेर आल्यानंतरही तेढ निर्माण करणारी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी वक्तव्य त्यांच्याकडून केली जाऊ शकतात, असं म्हटलं आहे. तसेच, खासदार नवनीत राणा यांचा विशेष उल्लेखही राज्य सरकारकडून या उत्तरात करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच, मुलुंड पोलीस स्थानकातही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दाम्पत्याला जामीन देऊ नये, असं म्हणत राज्य सरकारनं आपलं उत्तर दाखल केलं आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सध्या राणा दाम्पत्य कारागृहात असून खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Rohini Khadse on Chitra Wagh: वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल
वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल
Saamana Agralekh On Gas Shortage: सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Virar Crime News: मोठी बातमी: विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Embed widget