एक्स्प्लोर

Pravin Darekar : भाजपा नेते प्रवीण दरेकरांविरोधात तब्बल 904 पानी आरोपपत्र; 'या' दोघांच्या नावाचाही समावेश

Pravin Darekar : मुंबई बँक कथित मजूर प्रकरणात बेलार्ड पियर मेट्रोपोलिटन कोर्टात मुंबई पोलिसांकडून शुक्रवारी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

 Pravin Darekar : मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणी भाजपा नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि इतर दोन आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात इतर दोघांच्या नावाचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. प्रवीण दरेकरांविरोधात तब्बल 904 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

 904 पानी आरोपपत्रात कोणते कलम लावण्यात आले?

या आरोपपत्रात प्रवीण दरेकर यांच्यासोबतच प्रवीण मर्गज आणि श्रीकांत कदम या दोघांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई बँक कथित मजूर प्रकरणात बेलार्ड पियर मेट्रोपोलिटन कोर्टात मुंबई पोलिसांकडून शुक्रवारी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एकूण 904 पानी आरोपपत्रात तिन्ही आरोपींविरोधात आयपीसी कलम 199 , 200, 406, 417, 420, 465 ,468 , 471 आणि 120 -ब  अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत. 

एकूण 29 साक्षीदारांची साक्ष 
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकूण 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. त्यात 3 पोलीस अधिकारी, एक डेप्युटी कलेक्टर, काही शासकीय अधिकारी तर काही मुंबई बँकेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी दरेकर यांच्या विरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

काय आरोप?
दरम्यान, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दरेकर यांनी बँकेच्या निवडणुकीत बोगस कागदपत्रे देऊन उमेदवारी दाखल केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच आरोपपत्रात भाजपचे प्रवीण मारगज आणि श्रीकांत कदम यांचाही उल्लेख आहे. एमआरए मार्ग पोलिसांनी आज 904 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. यामध्ये 29 साक्षीदारांची यादी असून पोलिस आणि काही शासकीय अधिकारी आहेत. तसेच बँकेचे काही कर्मचारीदेखील आहेत. आम आदमी पार्टीचे नेते धनंजय कापसे यांनी दरेकर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. सन 1997 मध्ये प्रतिज्ञा सहकारी सोसायटीच्या सदस्य म्हणून त्यांनी मजूर नोंदणी केली होती. त्यानंतर त्यांनी दहा वर्षे बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आमदार म्हणून निवडून आल्यावर देखील त्यांनी ही नोंद कायम ठेवली होती, असा आरोप करण्यात आला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget