एक्स्प्लोर

Beed News : राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी माजी मंत्री अर्जुन खोतकरांचं भाषण अचानक थांबवलं! काय घडलं नेमकं?

Beed News : अर्जुन खोतकर यांचं भाषण रंगात आलं असतानाच सत्तारांनी त्यांचं भाषण थांबवलं, तर याच कार्यक्रमादरम्यान सुरेश नवले यांची क्षीरसागर कुटुंबावर सडकून टीका

Beed News : बीडमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचं अचानक भाषण थांबवलं, एका उद्घाटन समारंभामध्ये माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचं भाषण रंगात आलं असतानाच सत्तारांनी त्यांचं भाषण थांबवल्याने उपस्थित नागरिकही अचानक आश्चर्यचकित झाले. असे काय घडले?

"मी मंत्री असल्याने मला कायद्याच भान ठेवावं लागतं"
बीडमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी यांच्या मित्र मंडळ कार्यालयाच उद्घाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी बीड मधील सर्वच माजी आमदार उपस्थित होते. या उद्घाटन समारंभामध्ये माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच भाषण रंगात आलं असतानाच वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मंत्री अब्दुल सत्तार यांनी अचानक त्यांचं भाषण थांबवलं, मी मंत्री असल्याने मला कायद्याच भान ठेवावं लागतं, असं म्हणत कार्यक्रम संपायला दहा मिनिट राहिले असताना मला शेवटच्या दहा ओव्हर खेळू द्या असं म्हणत त्यांनी अर्जुन खोतकरांसमोर दिलगिरी व्यक्त केली.

"ते काँग्रेसमध्ये आले नाही म्हणून मी शिवसेनेत गेलो"

उद्घाटन समारंभामध्ये बोलताना सत्तार यांनी आपल्या मतदार संघात डिपॉझिट जप्त झालेल्या शिवसेनेला नवसंजीवनी कशी मिळून दिली? हे देखील सांगितलं, विरोधक माझ्याबद्दल प्रचार करताना अफजलखान पाहिजे का शिवाजी महाराज पाहिजे? असा प्रचार करतात. ते प्रत्येक वेळेस मला खान बोलले म्हणून मी बाण हाती घेतला. यावेळी बोलताना सत्तार यांनी खोतकर यांना काँग्रेसमध्ये आणता आलं नाही, याची खंत व्यक्त केली. ते काँग्रेसमध्ये आले नाही म्हणून मी शिवसेनेत गेलो असे अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले. 

अब्दुल सत्तार म्हणाले, मी पुन्हा येईल

आपल्या भाषणामध्ये नेहमीच चौफेर फटकेबाजी करणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी 'मी पुन्हा येईल' असं म्हटल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र वेळेअभावी माझं अपूर्ण राहिलेलं भाषण पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा येईल असं म्हणत सत्तार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या त्या वक्तव्याची आठवण करून दिली.

सुरेश नवले यांची क्षीरसागर कुटुंबावर सडकून टीका

तर दुसरीकडे बीडमध्ये याच कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री सुरेश नवले यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कुटुंबावर सडकून टीका केली आहे. बीड शहरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झालं असून पस्तीस-पस्तीस वर्षे सत्ता भोगणारे आम्हाला मेंढ्या सारखं वागवतात आणि क्षीरसागर यांच्या याच प्रस्थापित सत्तेच विश्लेषण करताना त्यांनी विठ्ठल आघाव यांची कविता म्हणून दाखवली. बीडच्या विकासासाठी आता नवा डाव खेळावा लागेल आणि हा डाव विकासाचा असेल असे देखील यावेळी सुरेश नवले म्हणाले आहेत

चुलते पुतणे गाजवतात
माय लेक गाजवतात 
आमच्याच कातड्याचे
ढोल सारे वाजवतात

सुरेश नवलेंचा क्षीरसागर यांना टोला

आम्हीं मेंढर मेंढरं 
यावं त्यानं हकलाव
पाचा वर्षाच्या बोलीने
होतो आमचा लिलाव

महत्वाच्या इतर बातम्या

Sanjay Raut : 'आप क्रोनोलॉजी समजिए' म्हणत सोमय्यांवर संजय राऊतांचा आणखी एक आरोप

NIA Raids : NIA कडून मुंबईत 20 ठिकाणी छापे; दाऊदच्या निकटवर्तीयांशी संबंधितांवर कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget