एक्स्प्लोर

Kirit Somaiya : असा *#@#* मुख्यमंत्री राज्यांनी पहिला नाही, यांना नोबेल मिळाला पाहिजे'; किरीट सोमय्यांचा घणाघात

Kirit Somaiya : सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 19 बंगल्याचं नाटक केलं, आता अनिल परब नाटक करत आहेत, यांना नोबेल मिळालं पाहिजे.

Kirit Somaiya : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना (Shiv Sena) नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर ईडीनं (ED) धाड टाकली आहे. एवढंच नाहीतर त्यांच्या निकटवर्तींयांवरही ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनिल परबांवर कारवाई केल्याचं बोललं जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांवर तोफ डागत हा कथित घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा केला होता. अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यावेळी सोमय्यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यावर टीका करताना सोमय्यांची जीभ घसरली आहे. 

असा *#@#* मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही. - सोमय्या
किरीट सोमय्या म्हणाले, 25 कोटींचा रिसॉर्ट अनिल परब यांचा आहे, उद्धव ठाकरे यांनी 19 बंगल्याचं नाटक केलं, आता परब नाटक करत आहेत, यांना नोबेल मिळालं पाहिजे. असा *#@#* मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिला नाही.  अनिल परब आता सुटणार नाहीत, त्यांना जेलमध्ये जावं लागणार आहे. हा पैसा वाझेचा आहे की खरमाटेचा आहे हा सवाल आहे. आता यशवंत जाधव यांची सुरुवात झाली, काल प्रधान डीलर या विरोधात कंपनी मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे, त्यांच्या पूर्ण परिवार विरोधात कारवाई सुरू झाली आहे. त्यांनतर उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचा नंबर लागणार आहे. काल परब म्हणाले तो मी नव्हेच, पळशीकर यांच्या एवजी या नाटकात अनिल परब असते, परब म्हणत आहेत, तो मी नव्हेच. काल ईडीचे लोक कशासाठी आले हे मला माहीत नाही. 17 डिसेंबर 2020 मध्ये मुरुड येथील ग्रामपंचायत पावती आहे, ज्यात रिसॉर्टची पावती भरली आहे. घरपट्टी, property tax भरला. जर कदम यांचं घर आहे तर परब यांनी tax का भरला? असा सवाल सोमय्यांनी केला. 

लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम
अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. "अनिल परब यांच्यावर ताबडतोब फसवणूक करण्यासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून 2020 मध्ये तीनमजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली होती. अनिल परब यांनी 19 जून 2019 रोजी पुण्यात राहणाऱ्या विवान साठे यांच्याकडून दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर जागा घेतली होती. 1 कोटींमध्ये ही जागा घेतली. खरेदीखत शेतजमीन म्हणून झालं. सगळी कागदपत्रं शेतजमीन म्हणून असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण सातच दिवसांत अनिल परब यांनी 26 जून 2019ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं. जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. यावेळी आरोप करताना किरीट सोमय्यांनी संबंधित खरेदीखत आणि इतर कागदपत्र देखील पत्रकार परिषदेत दाखवली होती.

"7 मे 2021 रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करून लॉकडाऊनदरम्यान अनिल परब यांनी 10 महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केलं. 10 मे रोजी मी स्वत: दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. 11 मे 2021ला अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2021 या काळासाठीचा 4 वर्षांचा टॅक्स तलाठीकडे भरला.", असा दावा किरीट सोमय्यांनी केला होता.

अनिल परब दापोली रिसॉर्ट घोटाळा; किरीट सोमय्या यांचे आरोप
मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारनी अनिल परब विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी याचिका दाखल केली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले. भारत सरकारने 17 डिसेंबर 2021 रोजी या रिसॉर्टला कारणे दाखवा नोटिस बजावली. या रिसॉर्टचा बिनशेती (NA) आदेश फसवणूक करुन मिळवण्यात आला होता म्हणून तो रद्द करण्यात आला. 

12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन केले. 30 डिसेंबर 2020 रोजी रिसॉर्ट व  जागा अनिल परब यांनी सदानंद कदम यांना 1.10 कोटी रुपयांत विकली, व करार शेतजमिन म्हणून केले. मार्च 2020 मध्ये रिसॉर्टसाठी महावितरणकडे व्यावसायिक वीज जोडणी करीता अर्ज केला. अनिल परब यांनी डिसेंबर 2020 मधे 2020-21 या वर्षाचे घरपट्टी/ कर ग्रामपंचायतीला भरणा केला. अनिल परब यांनी नोव्हेंबर 2019 रोजी 2019-20 या वर्षाचे घरपट्टी/ कर ग्रामपंचायतीला भरणा केला. ग्रामपंचायतीने जमीन व त्यावरील मालमत्ता 29 जून 2019 रोजी अनिल परबांच्या नावे करून 1074 हा मालमत्ता क्रमांक दिला. अनिल परब यांनी 26 जून 2019 ला ग्रामपंचायतीकडे सदर जमीन व त्यावरील बांधकाम / मालमत्ता त्यांच्या नावे करून कर आकारणी करावी असा अर्ज केला. 19 जून 2019 रोजी विभास साठे व अनिल परब यांच्यातील शेतजमिनीच्या कराराची नोंदणी झाली. 2 मे 2017 रोजी विभास साठेंकडून अनिल परबांनी गट क्र. 446 वरील 42 हेक्टर जमीन 1 कोटी रुपयांत विकत घेतली.

परब यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरला, आणि म्हणत आहेत ही शेती आहे
महावितरणने covid काळात मीटर दिलं, आधी मीटर दिलं आणि मग अर्ज केला. त्यांनी रिसॉर्ट बांधला, दिल्लीच्या टीमने पाहणी केली, CRZ मध्ये रिसॉर्ट बांधला असा रिपोर्ट सादर केला आणि 90 दिवसात तो पाडा असं परब यांना सांगितलं. 29 डिसेंबर 2020 मध्ये सदानंद कदम आणि अनिल परब यांनी करार केला आणि शेती जमीन घेतली असे खोटे करार पत्र केले, अनिल परब यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरला आणि म्हणत आहेत ही शेती आहे, अनिल परब लबाड आणि माफिया आहेत, याचे पुरावे लोकायुक्त यांच्याकडे दिले आहेत, 7 कोटी रुपये रिसॉर्टसाठी खर्च केले आहेत, त्यासाठी इन्कम टॅक्सने चौकशी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget