Navneet Rana : आज राणा दाम्पत्याबाबत मोठा व्हिडिओ बॉम्ब फोडणार! शिवसेना खासदारांची माहिती, राजकीय वर्तुळात चर्चा
shivsena MP krupal Tumane : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या अडचणीत आणखीच वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणीत आणखीच वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कारण आज दुपारी 3 वाजता राणा दाम्पत्याबाबत मोठा व्हिडिओ बॉम्ब फोडणार असल्याचं शिवसेना खासदार कृपाल तुमाणे (Shivsena MP krupal Tumane) यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत सर्वांनाच धक्का दिला आहे. यानंतर राणा दाम्पत्यांबाबत आणखी कोणता गौप्यस्फोट होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राणा दाम्पत्यांबाबत लेटेस्ट व्हिडिओ
राणा दाम्पत्यांबाबत आज दुपारी तीन वाजता काही व्हिडिओ मुंबई पोलिसांकडून सर्वांसमोर ठेवले जातील. नवनीत राणा कडून राज्य सरकार व पोलिसांवर जे आरोप लावण्यात आले आहेत. त्या संदर्भात हे व्हिडिओ असणार आहेत अशी माहिती तुमाणे यांनी पत्रकारांना दिली. ते लेटेस्ट व्हिडिओ असून त्यासंदर्भात आत्ताच सांगितले तर जिज्ञासा संपेल असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांनी केले आहे. त्यामुळे राणा प्रकरणासंदर्भात पोलीस पुढे काय करणार आहे, तपासात काय समोर येत आहे. याची उत्सुकता आहे.
पोलिसांची आगाऊ माहिती शिवसेना नेत्यांना कशी?
दरम्यान याची आगाऊ माहिती शिवसेना नेत्यांना असते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर पोलिसांच्या अँक्शनची आगाऊ माहिती शिवसेना नेत्यांना मिळत असेल, तर ती माहिती शिवसेना नेत्यांना कशी असते आणि ती माहिती कोण देते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज रवी राणा यांचा वाढदिवस
आज रवी राणा यांचा वाढदिवस असून त्यांना भेट द्यावीच लागेल. हनुमानजी ने त्यांना आधीच भेट दिली आहे असे ही तुमाणे म्हणाले. जर तुम्ही देवाचा गैरवापर करू लागले. जर देवा बद्दल खोटं बोलले तर असा बक्षिस मिळेलच आणि तो हनुमान जी ने दिलाच आहे असे तुमाणे म्हणाले...
राणा दाम्पत्यांकडून मुंबई पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप
राणा दाम्पत्यांना मुंबई पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पाणी देण्यात आलं नाही, तसेच बाथरूमदेखील वापरु दिलं नसल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करुन खार पोलीस स्टेशनमधला सीसीटीव्ही फूटेज शेअर केलं होतं. या फूटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे. मुंबई पोलिसांच्या या व्हिडीओनंतर ती अपमानास्पद वागणूक खार नव्हे तर सांताक्रूझ पोलिसांनी दिली असल्याचा आरोप राणांचे वकील अॅड. रिझवान मर्चंट यांनी केला होता. नवनीत राणा यांना सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्येही चांगली वागणूक दिल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं.