(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aditya Thackeray : 'हे गद्दारांचं सरकार आहे, त्यामुळे हे कोसळणारच' आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर टीका
Aditya Thackeray : शिवसेनेला संपवण्याचाच नव्हे, तर ठाकरे कुटुंबीयांना संपवण्याचे घाणेरडे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.
Aditya Thackeray : हे सरकार म्हणजे गद्दारांच सरकार आहे, बेईमानांच सरकार घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच अशी टीका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर काल जळगावात केली. काय म्हणाले आदित्य ठाकरे?
'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते तात्पुरते मुख्यमंत्री आहेत'
मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला. बोटीमध्ये एके 47 रायफल सापडल्या. मात्र या 40 गद्दारांना त्याचे काही घेणं देणं नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी हे गेले आहेत, यांना महाराष्ट्राचं या महाराष्ट्रातील जनतेचे काहीच घेणे-देणे नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सहभागी मंत्र्यांवर, आमदारावर टीका केली. त्यामुळे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते तात्पुरते मुख्यमंत्री आहेत. तर हे सरकार म्हणजे गद्दारांच सरकार आहे, बेईमानांच सरकार घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच अशी टीकाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.
33 देशांनी क्रांतीची नाही तर गद्दारांची नोंद घेतली.
शिवसेनेसोबत या बंडखोर आमदारांनी उठाव केला, क्रांती केली असं हे सांगत आहेत. यांनी केलेली या गद्दारीला हे बंडखोर क्रांती म्हणत असून त्याची इतर देशांनी दखल घेतल्याचे सांगत आहे. मात्र 33 देशांनी क्रांतीची नाही तर गद्दारांची नोंद घेतली. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटात सहभागी आमदारावर केली.
"आम्हाला सांभाळून घ्या, एकटं पडू देऊ नका" आदित्य ठाकरे यांचं भावनिक आवाहन
शिवसेनेला संपवण्याचाच नव्हे तर ठाकरे कुटुंबीयांना संपवण्याचा घाणेरडे राजकारण सध्या महाराष्ट्र सुरू आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबालायुक्त पडून देऊ नका आम्हाला सांभाळून घ्या असं भावनिक आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनतेला केल्याचं पाहायला मिळालं. बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात आदित्य ठाकरे यांची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होते, मात्र यावेळी या सर्व गद्दारांनी मस्ती करत महाराष्ट्राची लाज घालवली असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिंदे गटात सहभागी बंडखोर आमदारांवर केला.
थोडीशी लाज उरली असेल तर...आदित्य ठाकरेंचं आव्हान
जिथे आहे तिथे आनंदाने राहा, मात्र थोडीशी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या व निवडणूक लढा असं आव्हान सुद्धा यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं.
संबंधित बातम्या