एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे आवाहन ते भाजपची राज्यापालांची भेट... राजकीय घमासानाचा आठवा दिवस कसा होता?

Maharashtra Political Crisis : संध्याकाळनंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील या राजकीय घडामोडी.

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आजचा आठवा दिवस आहे. आजच्या दिवसात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे बंडखोरांना आवाहन, एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल ते भाजपची राज्यपालांची भेट या घटनांचा समावेश आहे. विशेषत: संध्याकाळनंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील या राजकीय घडामोडी.

उद्धव ठाकरेंनी पाठवलं की, स्वतःच घेतला निर्णय? उदय सामंत स्पष्टच बोलले
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचं जे कारस्थान सहयोगी पक्षांकडून सुरू आहे, त्याला कंटाळून मी गुवाहाटीला आलो, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षानं एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले आणि अखेर उमेदवार पडला, असं म्हणत उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, पुढे बोलताना याच कारणामुळे आपण शिंदे गटात सामील होण्याची भूमिका घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.  

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. असं असलं तरीही, आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेनं कोणताही गैरसमज करून घेऊ नये.", असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

शिवसेनेच्या संपर्कात कोण? नावं जाहीर करा, एकनाथ शिंदेंचं आव्हान
शिवसेनेचे बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. आमचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगावीत असे थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर हे तुम्हाला आमच्या निर्णयाची माहिती देतील असेही त्यांनी म्हटले. आज हॉटेल रॅडिसनच्या प्रवेशद्वाराजवळ येत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना दोन वेळा फोन?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार वाचवण्यासाठी दोन वेळा फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे-फडणवीस यांच्यात 21 जून रोजी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंनी भाजप श्रेष्ठींशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संपर्क झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वृत्तानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. परंतु, शिवसेनेकडून हे वृत्त फेटाळण्यात आलं आहे. या निव्वळ भूलथापा असून कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  

भाजप आणि शिंदे गटामध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या पडद्याआडून हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदासह 28 मंत्री असणार आहे. तर, शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेबाबत भाजप आणि एकनाथ शिंदे गटात झालेल्या चर्चेनुसार, दर 6 आमदारांमागदे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. मात्र, खाते वाटपाचे हे सूत्र अंतिम झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपकडे या सूत्रानुसार 28  मंत्रीपदे मिळणार आहेत. 

उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे गटाला आवाहन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे. "आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनानं शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजुनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल.", असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.

फ्लोअर टेस्ट घ्या बहुमत सिद्ध करु: दीपक केसरकर 
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले असून आम्ही एकटे पडलो असताना फडणवीसांनीच आपल्याला संरक्षण दिलं असल्याची कबुली दीपक केसरकरांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जेवढ्या लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न केला जाईल. फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आमची भूमिका मांडू. आज जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते इमोशनली ब्लॅकमेलचा प्रकार आहे असंही ते म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रांना सवाल
शिवसैनिकांनो, परत फिरा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आवाहन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी फेटाळलं आहे. हे आवाहन फेटाळताना त्यांनी मुख्यमंत्री तसेच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. एका बाजूने शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, कुत्रे, मृतदेह म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने हिंदूविरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी समेटाची हाक द्यायची याचा अर्थ काय असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक आरोप
राज्यात सत्तांतर व्हावे यासाठी एकनाथ शिंदे आणि शिवसेना बंडखोर आमदारांना भाजपने 7000 कोटी रुपये दिल्याचा सनसनाटी आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तर ज्या दिवशी शिवसेना पक्ष हायजॅक कराल त्या दिवशी महाराष्ट्रातील शिवसैनिक तुम्हाला जाळून टाकल्या शिवाय राहणार नाही असं धक्कादायक वक्तव्य सेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी केलं आहे. जालन्यातील मोर्चात चंद्रकात खैरे आणि माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी ही खळबळजनक वक्तव्यं केली आहेत.

सरकार अल्पमतात, त्यामुळे त्यांना बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत; भाजपची राज्यपालांकडे मागणी 
राज्यातल्या सत्तानाट्यात आता भाजपची एन्ट्री झाली असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे, त्यामुळे राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावं अशी मागणी भाजपने राज्यपालांकडे केली आहे. राज्यपाल यावर योग्य तो निर्णय घेतील असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या सत्तेच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यपालांना एक ई-मेलच्या माध्यमातून बंडखोर आमदारांनी पत्र दिलं आहे. शिवसेनेचे 39 आमदारांनी बंडखोरी केली असून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत रहायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निकालांचा अभ्यास करुन राज्यपाल त्यांना योग्य ते निर्देश देतील अशी आशा आम्हाला आहे."

तारीख आणि वेळ ठरल्यानंतर शिंदे गट मुंबईला येणार
राज्यातल्या राजकारणात भाजपने एन्ट्री घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर तिकडे गुवाहाटीमध्येही एकनाथ शिंदे गटाची बैठक पार पडली. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश दिल्यानंतर, त्याची तारीख आणि वेळ ठरल्यानंतर बंडखोर आमदार मुंबईला येणार आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षाचा सगळा गेम आता राज्यपालांच्या हाती आल्याचं चित्र आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Ravindra Chavan: डोंबिवली विधानसभा मतदारसंघात अर्तक्य हालचाली, श्रीकांत शिंदेंचा कट्टर समर्थक ठाकरेंकडे, रवींद्र चव्हाणांना विधानसभेला घेरण्याची तयारी?
दीपेश म्हात्रेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर डोंबिवलीत वेगळीच चर्चा, रवींद्र चव्हाणांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय मोहीम?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 6 AMHarshvardhan Patil : इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना तिकीट? लोकसभेतल्या मदतीची परतफेड? Special ReportRamraje Nimbalkar May Join NCP Sharad Pawar :पवारांनी कसली कंबर,रामराजेंचा तिसरा नंबर?Special reportZero Hour Full : पवारांचा दुसरा डाव, दादांना आव्हान ते कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Ravindra Chavan: डोंबिवली विधानसभा मतदारसंघात अर्तक्य हालचाली, श्रीकांत शिंदेंचा कट्टर समर्थक ठाकरेंकडे, रवींद्र चव्हाणांना विधानसभेला घेरण्याची तयारी?
दीपेश म्हात्रेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर डोंबिवलीत वेगळीच चर्चा, रवींद्र चव्हाणांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय मोहीम?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Embed widget