एक्स्प्लोर

Deepak Kesarkar :  होय, फडणवीसांनीच आम्हाला संरक्षण दिलं, फ्लोअर टेस्ट घ्या बहुमत सिद्ध करु: दीपक केसरकर 

Maharashtra Political Crisis : शरद पवारांनी तीन वेळा शिवसेना फोडली, आताही सत्तेसाठी ते शिवसेना पणाला लावत आहेत असं बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

मुंबई: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले असून आम्ही एकटे पडलो असताना फडणवीसांनीच आपल्याला संरक्षण दिलं असल्याची कबुली दीपक केसरकरांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जेवढ्या लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न केला जाईल. फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आमची भूमिका मांडू. आज जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते इमोशनली ब्लॅकमेलचा प्रकार आहे असंही ते म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी स्वत:हून आम्हाला संरक्षण दिलं
बंडखोर आमदारांच्या वतीनं बाजू मांडताना दीपक केसरकर म्हणाले की, माझे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. रात्री 12 वाजताही फडणवीस माझा फोन उचलतात. आज जर आम्ही एकटे पडलो तर त्यांच्याकडे मदत मागितली तर त्यात काय बिघडलं. फडणवीसांनी स्वत: हून आम्हाला संरक्षण दिलं. भाजप शासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळतंय. 

शरद पवारानी तीनवेळा शिवसेना फोडली
दीपक केसरकर म्हणाले की, राऊतांच्या वक्तव्यामुळे मोदी आणि ठाकरे यांचे संबंध बिघडत आहे. शरद पवारांनी तीन तीन वेळा शिवसेना फोडली. शिवसेनेचा आमदार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवाराला ताकत दिली जातेय. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना त्यांच्यावर विश्वास होता, पण ते आता शिवसेना संपवत आहेत. सत्ता जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पणाला लावण्यात येत आहे. आम्ही भाजपमध्ये विलिन होणार असं म्हटलं जातंय, पण या अफवा आहेत. 

राऊतांनी राजीनामा द्यावा, ते आमच्यामुळे खासदार
संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना केसरकर म्हणाले की, शिंदे गटाच्या आमदारांचा राऊत यांच्याबद्दल राग आहे. आम्ही जे निवडून आलो ते भाजप-शिवसेनेच्या युतीच्या जिवावर आलो आहोत. राऊत यांच्यासारखे प्रवक्ते कोणत्याही पक्षाला मिळू नये असं दिपक केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे यांना राऊत रिक्षावाला म्हणतात, पण त्याच रिक्षावाल्याने शिवसेनेचा एक विभाग सांभाळला, ठाण्यातील सत्ता शिवसेनेला मिळवून दिली असंही दीपक केसरकर म्हणाले. त्यामुळे अशी भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. 

शिंदे हेच आमच्या गटाचे नेते
एकनाथ शिंदे हेच आमच्या गटाचे नेते असल्याचा पुनरुच्चार दीपक केसरकर यांनी केला. आमच्या भावनेचा अंत पाहू नका, यापुढे जशास तसं उत्तर देऊ अशी निर्वाणीची भाषा केसरकरांनी वापरली. फडणवीस-ठाकरे यांच्यातील चर्चेकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो असं दिपक केसरकर म्हणाले. 

खर्च कोण करतंय?
आम्ही आमच्या हॉटेलचे बिलही भरु शकत नाही का असा सवाल दिपक केसरकर म्हणाले. बाहेर तिकडे जाळपोळ सुरू आहे त्यामुळे आम्हाला हॉटेलमध्ये यावं लागलं असं दीपक केसरकर म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Yuzvendra Chahal : लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
Embed widget