एक्स्प्लोर
Maharashtra police : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीसांकडून नऊ सूत्री धोरण जाहीर
Maharashtra police : लाऊडस्पीकर वादातून कोणत्याही संघटना आंदोलन करणार नाही याचीही काळजी घेण्याच्या सूचना आहेत. यासाठी पोलीसांनी नऊ सूत्री धोरण जाहीर केले आहे.

Mumbai Police (File Photo)
मुंबई : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी पोलिसांना विशेष सूचना दिल्या आहेत. सोशल मीडिया, बॅनरबाजी, बेकायदेशीर गोमांस वाहतूक यावर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिली आहे. पोलीसांनी नऊ सूत्री धोरण जाहीर करत राज्यभरातल्या पोलिसांना सूचना दिल्या आहेत. लाऊडस्पीकर वादातून कोणत्याही संघटना आंदोलन करणार नाही याचीही काळजी घेण्याच्या सूचना आहेत.
पोलीसांनी जाहीर केलेले नऊ सूत्री धोरण
- समाजात तेढ निर्माण करण्यासाठी त्या उद्देशाने सोशल मीडियावर मेसेज, फोटो, व्हिडीओ टाकून वातावरण तापवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील लॉ आणि ऑर्डरची स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे
- बेकायदेशीर गोमांस वाहतूक यावर करडी नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कारण बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
- पोस्टर लावण्यावरून राज्यात अनेक ठिकाणी वाद निर्माण आहे. त्यामुळे अनाधिकृत पोस्टर लावणाऱ्यांवर तसेच त्यावरील मजकूरावर लक्ष ठेवावे
- भोंग्याच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम संघटनेत आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी या संघटना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर लक्ष ठेवावे
- रमझान ईदनंतर बासी आणि तिवासी ईद साजरी करण्यासाठी मुस्लिम महिला आणि युवावर्ग चित्रपट पाहण्यासाठी किंवा गार्डनमध्ये जातात. अशावेळी छेडछाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवावे
- नमाज पठण करण्यासाठी मशिदीत गर्दी जमा होते. अशावेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा घटनांवर लक्ष ठेवावे
- कोणत्याही धार्मिक कारणावरून समाजात हिंसा निर्माण झाल्यास अशावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून संबंधितांवर कारवाई करा
- क्रिमिनल हिस्ट्री असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात प्रतिबंधित कारवाई करावी
- हिंदू आणि मुस्लिम बगुल भागात बंदोबस्त वाढवावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
