एक्स्प्लोर

दारुची तल्लफ भागवण्यासाठी सॅनिटायझर प्राशन?, यवतमाळमध्ये सात मृत्युमुखी

यवतमाळच्या वणीमध्ये सॅनिटायझर प्यायल्याने सात जणांचा मृत्यू झाला. दारुची तल्लफ भागवण्यासाठी ते सॅनिटायझर प्यायले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

यवतमाळ : सॅनिटायझर प्यायल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवळमाळच्या वणीमध्ये घडली आहे. लॉकडाऊनमुळे दारुची दुकानं बंद असल्याने, तल्लफ भागवण्यासाठी सॅनिटायझर प्यायले आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. दरम्यान या सात जणांचा मृत्यू सॅनिटायझर पिऊन झाल्याच्या वृत्ताला वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनीही दुजोरा दिला आहे. दत्ता लांजेवार ,विजय बावणे, नूतन पाथरटकर, संतोष मेहरे, सुनील ढेंगळे, गणेश शेलार, भारत रुईकर अशी मृतांची नावं आहेत. 

वणी शहरातील तेली फैलमधील दत्ता लांजेवार (वय 47 वर्षे) यांनी काल (23 एप्रिल) रात्री नऊ सुमारास सॅनिटायझर प्यायले आणि नंतर घरी आल्यावर रात्री दहा वाजता त्याच्या छातीत त्रास होण्यास सुरुवाल झाली. त्यानंतर असह्य वेदना होत असल्याने त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु रात्री अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

दारुची तल्लफ भागवण्यासाठी सॅनिटायझर प्राशन?, यवतमाळमध्ये सात मृत्युमुखी

तसंच नुतन पाथरटकर (वय 33 वर्षे) याचाही सॅनिटायझर पिऊन मृत्यू झाला. काल रात्री तो सॅनिटायझर प्यायला आणि नंतर त्रास होऊ लागल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तिथून तो घरी निघून आला आणि पहाटे त्याचा मृत्यू झाला. याशिवाय वणीच्या एकतानगर इथल्या संतोष मेहर सुद्धा सॅनिटायझर प्यायला आणि पहाटे 3.30 वाजता घरीच मृत्यू झाला. एकतानगरजवळ ढकल ठेला चालवून उदरनिर्वाह करणारा गणेश पाथरटकर याचाही रात्री सॅनिटायझर प्यायल्याने घरीच मृत्यू झाला आहे. तर सुनील ढेंगळे नावाच्या व्यक्तीनेही सॅनिटायझर पिऊन जीव गमावला. गणेश शेलार या व्यक्तीचा सुद्धा रात्री सॅनिटायझर प्यायल्याने घरीच मृत्यू झाला आहे.

दारुची तल्लफ भागवण्यासाठी सॅनिटायझर प्राशन?, यवतमाळमध्ये सात मृत्युमुखी

चार मृतदेहांवर नातेवाईकांनी परस्पर अंत्यसंस्कार केले असून तीन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. सॅनिटायझर प्यायल्याने त्यांना त्रास सुरु झाला आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती मृतांच्या नातेवाईकांनी वणी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना दिली.

मृत्युमुखी झालेली व्यक्ती कोणी रिक्षाचालक तर कोणी ढकल ठेला चालवून उदरनिर्वाह करणारी आहे. वणी इथे सात व्यक्तींचा सॅनिटायझर पिऊन मृत्यू झाल्याच्या गोष्टीला नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि वणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुल्लजवार यांनी सांगितलं. या सर्वांनी एकत्र एका ठिकाणी बसून सॅनिटायझर प्राशन केलं होतं का? याबद्दल पोलिसांकडून अद्याप दुजोरा किंवा माहिती मिळालेली नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलंDombivali Press Award | एबीपी माझाचे अँकर अश्विन बापट, सुरेश काटेंचा रोटरी क्लब तर्फे सन्मानSpecial Report Ajit pawar : धनूभाऊ, अजितदादांची सव्वा तास खलबतं, काय ठरलं?Rajkiya Shole Maharashtra Politics | संतोष देशमुख प्रकरणात अजितदादांचं मौन का? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

Embed widget