Raj Thackeray : पुण्यातील राजकीय वातावरण तापणार? राज ठाकरेंचा 29, 30 एप्रिलला दौरा
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 29, 30 एप्रिल रोजी पुणे दौरा करणार आहेत

Raj Thackeray Pune Visit : मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राज्यातील राजकारण तापलेलं असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौरा जाहीर केला आहे. 29, 30 एप्रिल रोजी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. औरंगाबादच्या सभेला पुण्यातून राज ठाकरे होणार रवाना होणार आहेत. इतकच नाही तर 3 मे रोजी होणाऱ्या महाआरतीसंदर्भात देखील नियोजन करण्यात आलेले आहे
राज ठाकरे 29, 30 एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. औरंगाबादच्या सभेला पुण्यातून राज ठाकरे होणार रवाना होणार आहे. मनसेच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीत औरंगाबाद सभेच्या नियोजनावर झाली चर्चा झाली. तसेच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही बैठकीत चर्चा झाली. इतकच नाही तर 3 मे रोजी होणाऱ्या महाआरती संदर्भात देखील नियोजन झालेले आहे . महाआरतीसाठी परवानगी देण्यासाठी शहरातील पोलीस स्टेशन मध्ये पत्र देण्याचे काम सुरु आहे. मनसे शहर कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
कायद्यापेक्षा भोंगा मोठा आहे का?
या देशातील सुप्रीम कोर्ट, कायद्यापेक्षा भोंगा मोठा आहे का असा सवाल राज यांनी उपस्थित केला. ज्यांना कायद्यापेक्षा भोंगा मोठा वाटतो त्यांना जसास तसे उत्तर देणार असल्याचेही राज यांनी सांगितले. त्यांनी जर पाचवेळा भोंगा लावून अजान म्हटली तर आम्ही देखील पाचवेळा मशिदींसमोर आरती म्हणार असल्याचे राज यांनी सांगितले. महाराष्ट्राची शांतता भंग करायची नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दंगल, हाणामारी करायची नाही. आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. मात्र, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे असेही राज ठाकरे यांनी म्हटले. येत्या 3 मे पर्यंत भोंगे उतरावेत असेही राज यांनी सांगितले.
औरंगाबादमध्ये जाहीर सभा
महाराष्ट्र दिनी, एक मे रोजी औरंगाबाद येथे राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत























