Nashik-Mumbai Highway : नाशिक-मुंबई महामार्गाची (Nashik-Mumbai Highway) दुरावस्थे विरोधात नाशिक जिल्ह्यातील विविध संघटनानी एल्गार पुकारला आहे. जोर्पयत रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी दूर होत नाही, तो पर्यंत नाशिककर (Nashik) टोल भरणार नाही, असा इशारा 26 हुन अधिक संघटनांनी दिला आहे. रस्ता दुरवस्थेमुळे तीन चार तासाच्या प्रवासाला आठ ते दहा तास लागत असल्यानं उद्योजकांचे लाखो कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून खड्ड्याच्या महामार्गापुढे 'मेक इन इंडिया' (Make In India) नाराही फिका पडतोय..



नाशिक-मुंबई महामार्गाची ही अवस्था काही केल्या सुधारत नसून पावसाळी अधिवेशनात (Rainy Session) यावरून मोठा गदारोळ झाला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अधिवेशनानंतर लोकप्रतिनधी आपापल्या मतदारसंघात पोहचले आणि जनता टोलचा भुर्दंड सहन करत आजही या मोठमोठ्या खड्यातून प्रवास करतेय पुढे जाऊन वाहतूक कोंडीत तासंतास घालवतेय. तर सर्वपक्षिय नेते मात्र गेल्या महिनाभरापासून रेल्वेच्या एसी बोगीतून (railway Tour) प्रवास करत नाशिक-मुंबई महार्गापासून  स्वतःची सुटका करून घेत असल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या दुरावस्थेचा सर्वसामान्य नागरिक रुग्ण, विद्यार्थी सर्वानांच मनस्ताप तर सहन करावाच लागत असून  मात्र कोट्यवधी रुपयांचे नुकसानही होतं आहे. 


नाशिकचे युवा उदयॊजक निखिल पांचाल (Nikhil Panchal) यांना नाशिक-मुंबई महामार्गाचा त्यांना जबर फटका बसला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी मशिनरी, इंजिनचे स्पेअरपार्ट बनविण्याचे काम त्यांच्या कंपनीत चालते. मेक इन इंडियाचा नारा बुलंद करण्यासाठी जर्मनीतील इंजिनियरिंग प्रदर्शनात ते सहभागी होणार होते. एक वर्षापासून स्टोल बुकिंगसह प्रदर्शनाची इतर तयारी करत होते. मागील महिन्यात झालेल्या प्रदर्शनसाठी ते नाशिकहून निघालेही होते. मात्र दुपारी 2 वाजता नाशिकहून रस्ता मार्गाने निघूनही रात्री 8 वाजेपर्यंत मुंबईत पोहचु शकले नसल्यानं जर्मनीच्या विमानाने त्यांच्याविनाच उड्डाण घेतले. त्यामुळे एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नाशिकच्या नावाची मोहर उमटविणाची संधी केवळ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हुकली. प्रदर्शनच्या शेवटच्या दिवशी निखिल जर्मनीत पोहचले. त्यांची वर्षभराची मेहनत वाया तर गेलीच पण प्रदर्शनातील स्टॉल रिकामाच राहिल्यानं शरमेनं त्यांची मान खाली गेली. प्रदर्शनात सादरीकरण ही करता आले नसल्याची खंत त्यांना वाटतेय. रस्ता खराब असल्यानं प्रदर्शनाला वेळेत उपस्थित राहू शकलो नाही, हे सांगायचे तरी कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे. 


तोपर्यंत नाशिककर टोल भरणार नाही...


नाशिक-मुंबई महामार्गचे खड्डे, वाहतूक कोंडीचा फटका बसणारे निखिल पांचाल हे केवळ एकटेच उद्योजक नाहीतर असे असंख्य व्यापारी, उद्योजक, नागरिक आहेत, ज्यांना रस्त्याच्या दुरावस्थेचा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळेच नाशिकमधील व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यासायिक असा वेगवेगळ्या  क्षेत्रात काम करणाऱ्या 26 हुन अधिक संघटना एकत्र आल्या असून त्यांनी  दबावगट निर्माण करत सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे.. जो पर्यंत नाशिक मुंबई महार्गावरील खड्डेचा प्रश्न मार्गी लागत नाही. वाहतूक कोंडीची समस्या सुटत नाही, तोपर्यंत नाशिककर टोल भरणार नाही असा इशारा दिला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री पाठोपाठ मुख्यमंत्र्याची भेट घेऊन भूमिका मांडणार आहेत. पावसाळी अधिवेशनात गदारोळ झाल्यानंतर दोन तीन दिवस महामार्गाची डागडुजी करण्याचा दिखाऊपणा यंत्रणांनी केला. मात्र आता पुन्हा एकदा परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे पुढील 15 दिवसांनी पुन्हा दुसरी बैठक घेतली जाणार असून त्यात आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासकीय पातळीवर किती वेगवान हालचाली होतात, यावर आंदोलनाची पुढची दिशा ठरविली जाणार आहे.


 


इतर संबंधित बातम्या :