Chhagan Bhujbal : संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य केले. त्यानंतर महात्मा फुले (Mahatma Fule) यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले. भिडे यांची बुद्धी भ्रष्ट झालीय की त्यांच्याकडून कोणी बोलत आहेत, हे तपासण्याची गरज आहे. उद्या मोदी महाराष्ट्रात येत असून त्यांच्या कानावर हा विषय घातला पाहिजे. सरकारने कठोर पावले उचलून भिडेंवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी आज मंत्री छगन भुजबळ (Chhagana Bhujbal) यांनी केली आहे. 


गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात भिडे (Manohar Bhide) यांच्या वक्तव्यावरून नवा वाद रंगला आहे. संभाजी भिडे सातत्याने वादग्रस्त विधाने करत असल्याने राजकीय नेत्यांकडून अटकेची मागणी करण्यात येत आहे. कालच मंत्री छगन भुजबळ यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. आज पुन्हा छगन भुजबळ यांनी भिडेंवर कारवाई झालीच पाहिजे, यासाठी सरकारने कठोर पाउल उचलावे असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य केले. त्यानंतर महात्मा फुले यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केले. भिडे यांची बुद्धी भ्रष्ट झालीय की, त्याच्याकडून कोणी बोलून घेत आहे, हे तपासण्याची गरज आहे. मनोहर भिडे 15 ऑगस्टसुद्धा मानायला तयार नाहीत, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करायला पाहिजे. राज्यात देशात वातावरण दूषित करण्याचं काम करत असून त्याविरोधात सर्वाना एकत्र आले पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले. 


छगन भुजबळ खड्ड्यांच्या प्रश्नावर म्हणाले की, नाशिक-मुंबई मार्ग (Nashik mumbai Highway) खड्डेमय झाला असून मुख्यमंत्री स्वतः पाहणी करत आहेत. नाशिक-मुंबई मार्गावर मास्टिकचा  प्रयोग केला जात आहे. नाशिक शहरात त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. शहरातील अनेक भागात खड्डे पडले आहेत, मात्र सद्यस्थितीत नवीन अधिकारी आले असल्याने त्यांना थोडा वेळ द्यावा लागणार आहे. नवीन आयुक्त आले असून त्यांना खड्डे बुजविण्याचं सूचना दिल्या आहेत. तसेच एका कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) गेलो असताना नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता चांगला आहे, मात्र काही ठिकाणी खड्डे आहेत, ते कामही लवकर होईल, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली. तसेच मागच्या कुंभमेळा (Kumbhmela) काळात ही शहरात रिंगरोड करण्यात आले होते, शहराच्या बाहेरून वाहन जात असल्याने त्याचा वाहतूक सुरळीत करायला फायदा झाला. आता नवीन रिंगरोड होत असेल तर त्याविषयी माहिती नाही, सार्वजनिक बांधकाम दादा भुसे यांच्यां माध्यमातून काम केले जात असेल, असे भुजबळ म्हणाले. 


बावनकुळे आता पंडित झाले आहेत का?


दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) हे कमळाचा प्रचार करणार असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यावर भुजबळ म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे अजितदादाविषयी कोणत्या आधारावर बोलले, मला माहिती नाही, बावनकुळे यांना सर्वच आधीच दिसतंय. बावनकुळे आता पंडित झाले आहेत का? अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते आहेत, ते राष्ट्रवादीचाच प्रचार करणार असे भुजबळ म्हणाले आहेत. तर नितीन गडकरी यांनी शरद पवार हे जपानी बाहुली असल्याचे विधान केले यावर भुजबळ म्हणाले की,नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे जवळचे  सबंध आहेत. ते एकमेकांना भेटत असतात, बोलत असतात. गडकरी का बोलले, त्याचा संदर्भ मला माहिती नाही, पण असे बोलून मैत्रीत वाद वाढवेल नाही तर बरं आहे, असे ते म्हणाले. तर उद्या महाराष्ट्रात पीएम मोदी येत आहेत. या कार्यक्रमाला शरद पवार जाणार का? असे विचारल्यावर भुजबळ म्हणाले की शरद पवार मोदींच्या कार्यक्रमाला एकत्र येत आहेत, लोकमान्य टिळक समितीत पवार साहेब आहेत, म्हणून ते जात असतील, पण त्यांनी जावे की नाही हे सांगण्या येवढा मी मोठा नाही, असे भुजबळांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhagan Bhujbal : भिडेंचे डोकं ठिकाणावर आहे की नाही, हेच कळत नाही? मंत्री छगन भुजबळांचे टीकास्त्र