Cm Eknath Shinde : नाशिक-मुंबई महामार्ग खड्डे मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून पाऊस असल्यामुळे मास्टिकचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी पाहणी करुन हे खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच शंभर ते दीडशे पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन घेण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. तसेच काही ठिकाणी बाईकर्स पोलीस तैनात करण्यात येणार असून त्या माध्यमातून वाहतूक कोंडी सुरळीत केली जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik highway) पाहणी दौरा सुरg केला. यावेळी त्यांनी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे-नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यामुळे आज रविवारी मुख्यमंत्र्यांनी स्वतः फिल्डवर उतरुन मुंबई-नाशिक महामार्गाची पाहणी केली. भिवंडी शहरातील (Bhivandi) वडपा तसेच अपघात घडत असलेल्या खडवली या भागात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. तर दुसरीकडे ग्रामीण पोलीस मुख्यालयाची देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करत सूचना दिल्या आहेत. 


भिवंडी बायपास नाशिककडून मुंबईला येणाऱ्या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. ठाण्यावरुन शहापूरपर्यंत सगळ्या रस्त्यांची पाहणी करत असून कोणत्या मार्गावर कशाची आवश्यकता आहे, हे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले असून तशा सूचना दिलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी खडवलीला एक अपघात (Bhivandi Accident) झाला होता, त्यावेळी सहा लोकांचा मृत्यू झाला. अपघाताची कारणे, होणारी वाहतूक कोंडी यावर मार्ग काढण्यासाठी एक बैठक मंत्रालयात झाली होती. त्यात काही उपाययोजना सुचवल्या आहेत. त्याचप्रमाणे जे आवश्यक क्रॉसिंग आहेत, त्यावर देखील नॅशनल हायवेच्या नॉर्म्सप्रमाणे त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर काही मार्गांवरील क्रॉसिंग काढले तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, "नाशिक-मुंबई महामार्ग खड्डे मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून पाऊस असल्यामुळे मासस्टिकचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अवजड वाहने डाव्या बाजूने गेली तर ॲम्बुलन्स, नागरिकांना त्यांना एक लेन मोकळी मिळेल, यासाठी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी शंभर ते दीडशे पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन घेण्याचा विचार आहे. अवजड वाहने डाव्या बाजूने गेले पाहिजे, याची अंमलबजावणी काटेकोरपणाने केली तर वाहतूक सुरळीत होईल, असेही ते म्हणाले. अवजड वाहने रस्त्यावर आले तर आम्ही काही स्पॉट तयार केले. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी पार्किंगसह सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिक, वाहनचालक व स्थानिक लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना सुचवलेल्या आहेत."


तात्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश


तर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यासंदर्भात व होणाऱ्या वाहतूक कोंडी साठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी पाहणी करून हे खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच महामार्गाच्या बाजूला सर्विस रोड सुरू करायला सांगितले असून त्याचबरोबर फ्लायओव्हरचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खडवली येथे झालेल्या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची सरकारने मदत जाहीर केली आहे. तसेच नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिलेल्या असून आठ लाईनचे जे काम सुरू आहे, पावसात जे काही काम करता येईल. स्ट्रक्चर्स असेल डब्ल्यूबीएम असेल ते करा. आठ लेनच्या सर्विस रोडचे कामे तातडीने करा, महामार्ग खड्डे मुक्त करा, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 


वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बायकर्स पोलीस 


दरम्यान भिवंडी बायपासवरील दोन्हीकडे काँक्रिटचे रस्ते झाले असून त्याचा वापरही सुरु केल्यानंतर वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनासाठी डाव्या बाजूने वाहतूक सुरु करण्यात येईल. त्यासाठी अनाउन्समेंट आणि बायकर्स पोलीस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कट केलेले मार्ग बंद असून काही गावांना येजा करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना ये जा करण्यासाठी हाईट बॅरियर टाकण्याचा सूचना केल्या आहेत. तसेच रस्त्यावर आरोग्य केंद्राची मागणी होती, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून आरोग्य रुग्णालय उभारण्यासाठी आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर तरतूद केली जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.


 


ईतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik-Mumbai Highway : नाशिक-मुंबई रस्त्याची वाहतूक कोंडी सभागृहात गाजली, थोरात म्हणाले....भुजबळ, भुसे याच मार्गाने जातात