एक्स्प्लोर

Nashik : रेल्वेतून बॅग चोरली, 'ती' एसटीच्या कर्मचाऱ्यांना सापडली, तरुण आत्महत्या करणार होता, मात्र... काय घडलं नेमकं? 

Nashik News : विशेष म्हणजे राजरत्न कोकाटे इस्रोमध्ये निवड झाली असून याच कामी तो मुंबईला कागदपत्रे पडताळणीसाठी जात होता.

Nashik News : बुलढाण्याहून (Budlhana) मुंबईला रेल्वेने निघालेल्या एका प्रवाशाची बँग नाशिक (Nashik) ते इगतपुरीदरम्यान (Igatpuri) चोरट्यांनी रेल्वेतून चोरली. मात्र, ही चोरलेली बॅग कसारा-धुळे या बसमध्ये बेवारस स्थितीत एसटी कर्मचाऱ्यांना सापडली. सापडलेली बॅग ही बुलढाण्यातील संग्रामपूर येथील प्रवाशाची असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बॅग पोहचविण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि मालकाला बॅग परत केली.

हल्ली अनेकदा, रस्त्यावरून चालताना, कधी रिक्षात, तर कधी बसमध्ये अनेक नागरिकांच्या वस्तू हरविल्याची घटना निदर्शनास येतात. त्यामुळे अशा वस्तू सापडणे मुश्किल होऊन बसते. मात्र काही घटनांमध्ये आश्चर्यकारकरित्या अशा हरवलेल्या वस्तू परत मिळाल्याच्या दुर्मिळ घटना बघायला मिळतात. अशीच काहीशी घटना बुलढाणा येथील राजरत्न कोकाटे यांच्यासोबत घडली. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांना (Maharashtra ST) सापडलेल्या वस्तूबाबत केवळ प्रामाणिकपणा दाखविला नाही, तर मालकापर्यंत पोहोचण्याची तत्परता दाखवून आपल्या कर्तव्यदक्षेतेचा परिचयही दिला. इगतपुरी आगारात कार्यरत असलेले वाहक गोरख हिरामण शिंदे व चालक प्रकाश रामदास खाडे हे कसारा- धुळे मार्गावर (Kasara Dhule) कर्तव्य करीत असताना कसारा येथे त्यांना बसमध्ये बेवारस असलेली बॅग आढळून आली. 

दरम्यान बॅग मालकाची माहिती मिळावी यासाठी बॅगची तपासणी केली असता बुलढाणा येथील संग्रामपूर येथील एकलहरे गावातील राजरत्न प्रभाकर कोकाटे यांची बॅग असल्याचे समोर आले. या बॅगेत शैक्षणिक कागदपत्रे, तसेच 14 हजार रुपयांची रोकड देखील मिळून आली. तर दोन मोबाईल नंबर मिळून आले, मात्र या नंबरवर कॉल केला असता बंद असल्याचे समजले. यावर चालक वाहकांनी स्वतः या नंबरवर रिचार्ज करत नंबरवर संपर्क साधला. सुदैवाने ज्याची बॅग हरवली होती, त्यानेच फोन उचलला, त्यानंतर सगळी कहाणी उघड होऊन चालक वाहकांसह कोकाटे यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान राजरत्न हा दिव्यांग असून हिंगोली येथे जिल्हा परिषदेत लिपिक म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे त्यांची इस्रोमध्ये निवड झाली असून याच कामी तो मुंबईला कागदपत्रे पडताळणीसाठी जात होता. बॅगेतील पहिल्या कप्प्यात 1700 रुपये होते, ते चोरट्याने काढून घेत चोरट्याने बॅग एसटी बसमध्ये ठेवून दिली. सुदैवाने आतील कप्प्यात असलेली 14 हजार रुपयांची रोकड, कागदपत्रे सुरक्षित राहिली. 

राजरत्नच्या मनात आत्महत्येचे विचार

दरम्यान चोरीस गेलेल्या बॅगेत सर्व शैक्षणिक कागदपत्रे होती. इस्रोसारख्या संस्थेत निवड झाल्याने अनेक स्वप्ने त्याने पाहिली. परंतु प्रवासात बॅगच हरविल्याने त्याचे स्वप्न क्षणात धुळीस मिळाले. हरविलेली बॅग मिळावी म्हणून त्याने पोलिस ठाणे गाठले. तेथे चोरीची फिर्याद दाखल केली. परंतु बॅग मिळेल की नाही, याची शाश्वती त्याला नव्हती. त्यामुळे आत्महत्येचे विचार मनात घोळत होते, असे तो सांगत असताना सर्वांना धक्का बसला. एसटी कर्मचाऱ्यांनी बॅग परत केल्याने त्याला एक प्रकारे जीवदान मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

इतर संबंधित बातम्या : 

Nashik News : नाशिकच्या रुग्णवाहिका चालकाचा प्रामाणिकपणा; रुग्णांची पर्स केली परत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्येMuddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget