मनसेच्या आठवणीनं किरीट सोमय्यांना उचकी लागली? सारखे विचारतात 'सोमय्या आले का?'
Kirit somaiya : रंगपंचमीच्या दिवशी सारे राजकीय नेते राजकीय रंगपंचमी खेळत असताना रत्नागिरीत मात्र मनसेला मात्र किरिट सोमय्यांची आठवण झाली.
![मनसेच्या आठवणीनं किरीट सोमय्यांना उचकी लागली? सारखे विचारतात 'सोमय्या आले का?' Maharashtra News MNS reaction on Kirit somaiya मनसेच्या आठवणीनं किरीट सोमय्यांना उचकी लागली? सारखे विचारतात 'सोमय्या आले का?'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/23/11eaa8380692af782f671e2b6109bd52_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रत्नागिरी : सध्याचं राजकारण वाट पाहण्यापेक्षा वाट लावण्याचं असल्याची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया असते. त्यात दुसऱ्या पक्षातील कुणी नेता असल्यास त्याच्या दौऱ्याकडे सहसा कुणी पाहत नाही. पण, आता तुम्हाला कुणी सांगितलं की, किरिट सोमय्यांच्या कोकणातील दौऱ्याकडे मनसे डोळे लावून बसली आहे. तर, तुमचा विश्वास नाही बसणार. पण, हे नाकारता देखील येणार नाही बरं का? कारण, मनेसेचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील नगराध्यक्ष यांनी चक्क आपल्या टी शर्टवर व्हेरी गुड, सोमय्या आले का? असा प्रश्न विचारला आहे.
मुख्य बाब म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी सारे राजकीय नेते राजकीय रंगपंचमी खेळत असताना मनसेला मात्र किरिट सोमय्यांची आठवण झाली. त्यामुळे मनसेनं आठवण काढली आणि सोमय्यांना उचकी तर लागली नाही ना? असा मजेशीर सवाल देखील सध्या सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. मुळात सध्याच्या राजकारणात होणारे आरोप - प्रत्यारोप पाहता कोकणातील मनसेला झालेली सोमय्यांची आठवण मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. पांढऱ्या शुभ्र सदऱ्यावर लाल भडक अक्षरात व्हेरी गुड, सोमय्या आले का? हे शब्द मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे कोकणात मनसेनं सोमय्यांची काढलेली आठवण मात्र सर्वांच्या तोंडावर होती.
कधी येणार सोमय्या?
आता मनसेला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर देखील मिळणं गरजेचं आहे. कारण मनसेचं त्यांची आतुरतेनं वाट पाहत आहे. तर, 26 मार्च रोजी किरिट सोमय्या दापोली येथे येणार आहेत. यावेळी ते अनिल परब यांच्या रिसॉर्टची पाहणी करत त्यावर कारवाईची मागणी देखील करणार आहेत. ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पण, असं असलं तरी मनसेचे डोळे मात्र किरिट सोमय्यांच्या दौऱ्याकडे लागून राहिले आहेत. आता अर्थात किरीट सोमय्यांची आठवण काढणारी मनसे 26 मार्च रोजी काय करणार हे देखील पाहावं लागणार आहे.
संबंधित बातम्या :
Maharashtra: घोटाळेबाजांना सोडणार नाही! उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर झालेल्या ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्या आक्रमक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)