(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Election Result: मराठवाड्यात भाजपचे वर्चस्व, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर; पाहा कुणाला किती जागा मिळाल्या
Marathwada Gram Panchayat Election Result 2022: मराठवाड्यातील 2 हजार 73 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला आहे.
Marathwada Gram Panchayat Election Result 2022: राज्यात झालेल्या सात हजारपेक्षा अधिकच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. तर मराठवाड्यातील 2 हजार 73 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला आहे. ज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून ,मराठवाड्यात भाजपला 721 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीला 452 जागांवर विजयाचा झेंडा फडकवता आला आहे. तर सर्वात कमी 123 जागा शिंदे गटाला मिळाल्या आहेत.
पाहा कोणाला किती जागा...
औरंगाबाद
जिल्हा | भाजप | शिंदे गट | ठाकरे गट | राष्ट्रवादी | काँग्रेस | इतर |
औरंगाबाद | 55 | 65 | 32 | 14 | 10 | 18 |
जालना | 124 | 08 | 31 | 69 | 16 | 18 |
बीड (एक जागेवर निकाल नाही) |
257 | 06 | 13 | 246 | 38 | 00 |
परभणी | 38 | 03 | 06 | 29 | 02 | 39 |
लातूर (एक जागेवर निकाल नाही) | 160 | 03 | 16 | 42 | 80 | 44 |
उस्मानाबाद | 55 | 19 | 31 | 13 | 20 | 28 |
नांदेड | 23 | 01 | 24 | 32 | 57 | 44 |
हिंगोली | 09 | 18 | 08 | 08 | 06 | 12 |
एकूण | 721 | 123 | 161 | 452 | 229 | 203 |
औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाचं वर्चस्व....
मराठवाड्यात शिंदे गटाला सर्वाधिक कमी जागा मिळाल्या असल्या तरीही मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात मात्र शिंदे गटाचं वर्चस्व पाहायला मिळाले आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 65 जागांवर शिंदे गटाला विजय मिळवता आला आहे. तर त्या पाठोपाठ भाजपची ताकद पाहायला मिळाली असून, भाजपला 32 ठिकाणी विजय मिळवता आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाचे 5 आमदार आणि त्यातील दोन कॅबिनेट मंत्री असल्याने याचा मोठा फायदा शिंदे गटाला होतांना पाहायला मिळत आहे.