Maharashtra News LIVE Updates : आज कोकणातील मराठा समाजाचा भव्य मेळावा, हजारो मराठे एकवटणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
Atal Setu : नव्या भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई द्या : हायकोर्ट
Parbhani Protest : ऊस दरासाठी परभणीत स्वाभिमानी अन् किसान सभेचा 2 तास रास्ता रोको
Parbhani News : उसाला 2700 रुपये भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या वतीने परभणी गंगाखेड महामार्गावरील सिंगणापूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले जवळपास दोन तास हा रास्ता रोको चालला यामुळे परभणी गंगाखेड महामार्ग तसेच पूर्णा-परभणी महामार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.राजू शेट्टी आणि कारखानदार यांच्यात बैठक झाली यात 2500 ऐवजी 2700 रुपये भाव देण्याचे मान्य करण्यात आल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले.
MAHARERA : 'स्वयंभू प्रकल्प: एकच महारेरा क्रमांक' धोरण राज्यात लागू
MAHARERA : मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पांना एकापेक्षा जास्त महारेरा (MAHARERA) नोंदणीक्रमांकामुळे घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी महारेरानं नुकताच एक निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे आदेश महारेरानं जारी करुन तातडीनं लागू केले आहेत. दरम्यान, गृहनिर्माण प्रकल्पांना एकापेक्षा जास्त महारेरा नोंदणीक्रमांकामुळे घर खरेदीदारांची होऊ शकणारी फसवणूक टाळण्यासाठी महारेरानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
El Nino Monsoon Update : आगामी मान्सून हंगामात मान्सून सर्वसाधारण राहण्याची शक्यता
El Nino Monsoon Update : आगामी मान्सून हंगामाच्या आधी महासागराचे तापमान सर्वसाधारण पातळीवर येण्याचे संकेत अमेरिकी हवामान शास्त्र संस्था नोआने दिले आहेत. आगामी मान्सून हंगामासाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे. एल निनोची शक्यता नसल्याने पाऊस सर्वसाधारण राहील असा अंदाज आहे.
Sachin Kharat : सचिन खरात यांचा सुशीलकुमार शिंदेंवर निशाणा
Sachin Kharat on Sushilkumar Shinde : काँग्रेस पक्षाचे नेते सुशीलकुमार शिंदे बोलताना म्हणाले प्रणिती शिंदे आणि मला भाजपची दोन वेळा ऑफर, परंतु सुशील कुमार शिंदे यांनी मध्यंतरी म्हणाले ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे त्यांनी आरक्षण सोडावे, परंतु त्याच राखीव मतदारसंघांमधून त्यांना आता निवडून यायचे आहे, म्हणून स्वतःचे महत्त्व वाढवण्याकरता आणि पराभव दिसू लागल्यामुळे मला आणि माझ्या मुलीला भाजपने दोन वेळा ऑफर दिले असे विधान केल्याचे दिसत आहे, परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष म्हणून महायुतीला मागणी करत आहे की सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव आहे आणि माझा आरपीआय सचिन खरात गट पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजितदादा पवार) मित्र पक्ष आहे त्यामुळे महायुतीची उमेदवारी आरपीआय खरात पक्षाला म्हणजेच मला द्यावी अशी मागणी करत आहे.