Beed News : चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती; बीडमधील घटनेने खळबळ
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
कांद्याचे निर्यात शुल्क वाढीच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटत असून धुळ्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच कांदा रस्त्यावर फेकला... कांद्याचे निर्यात शुल्कात वाढ करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी त्रासदायक असून केंद्र सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाने दिला...
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क(onion) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात खासदार अमोल कोल्हे यांनी आंदोलन छेडलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या निर्णयाने शेतकरी समाधानी नसल्याने अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम आहेत. कांदा फेकून दिला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना जाग आली नाही का? असा सवाल उपस्थित करत आम्हाला 4 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळायलाच हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सविस्तर :Amol Kolhe : 4000 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळायलाच हवा; खासदार अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम
Piyush Goyal : केंद्र सरकारनं नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा 2 हजार 410 रुपये प्रति क्विंटल दराने मिळणार आहे. दरम्यान, या कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात होणार आहे. आवश्यकता भासल्यास अधिकचा कांदाही खरेदी करणार असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal) यांनी व्यक्त केलं.
सविस्तर : Piyush Goyal : कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात, आवश्यकता भासल्यास अधिकचा कांदाही खरेदी करणार : पियूष गोयल
Ajit Nawale : केवळ दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यानं समस्या सुटणार नाही, तर केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात कर रद्द करावा अशी मागणी मागणी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Dr Ajit Nawale) यांनी केलीय. महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक आहे. एकीकडे त्या संपूर्ण कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावायचा आणि दुसरीकडे आम्ही शेतकऱ्यांसाठी फार काही करतोय असे दाखवत केवळ दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा. हा समस्येवरील उपाय नसल्याचे अजित नवलेंनी म्हटलंय.
Onion News : केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा (onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमितशाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी फडणवीस यांनी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
Buldhana News : सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुलढाण्याच्या एसटी आगार व्यवस्थापकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. पंढरपूर यात्रेदरम्यान बसमध्ये स्वयंपाक करण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी विभाग नियंत्रकाकडे अहवाल पाठवण्यासाठी 35 हजार रुपयांची लाच बुलढाणा आगार व्यवस्थापक संतोष वानेरे यांनी वाहक महादेव सावरकर यांच्यामार्फत मागितली होती. याची तक्रार बुलडाणा एसीबीकडे करण्यात आल्यानंतर पथकाने, सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना बुलडाणा शहरातील खामगाव रोडवर अटक केली.
Mumbai Kurla Wall Collapsed : कुर्ला पश्चिम येथील सुभाष नगरमध्ये इमारतीच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला आहे. ही संरक्षक भिंत खाली असलेल्या घरांवर पडून वैष्णवी प्रजापती या 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. रात्री आठ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सुभाषनगर येथील जैन सदन या इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागून पाच घरे आहेत. यातील तीन घरांवर रात्री अचानक संरक्षक भिंत कोसळली. मध्यावर असलेल्या प्रजापती कुटुंबाच्या घरावर भिंतीचा मोठा भाग कोसळला. यात वैष्णवी चिरडली गेली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरु केले. वैष्णवीला बाहेर काढून पालिकेच्या राजावाडी रुग्णालय पाठवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेत तीन घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर 'जागतिक हेलियम दिवस' साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक
राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
विजयदुर्गवर आज साजरा होणार 'जागतिक हेलियम दिवस'
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी 'साहेबांचा ओट' या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून करणार आहेत.
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी
कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक
लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -