Mumbai University Senate Election : आदित्य ठाकरे यांना पुन्हा धक्का, दहा सिनेट सदस्यांपैकी चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आदित्य ठाकरे यांना पुन्हा धक्का, दहा सिनेट सदस्यांपैकी चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल.
प्रवीण पाटकर या सिनेट सदस्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश.
आजच मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका रद्द केल्यामुळे आदित्य ठाकरेंची युवा सेना आक्रमक झाली होती.
सरकार निवडणुकांना घाबरत असल्याचा आदित्य ठाकरे यांनी केला होता दावा.
मात्र बोगस मतदार नोंदणी होत असल्यामुळे निवडणुका स्थगित केल्याचा आशिष शेलार आणि राहुल कनल यांचा दावा.
Cabinet Meeting: आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याचीही आढावा घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणाराय. राज्यातील अनेक भागांकडे पावसाने पाठ फिरवलीय. शिवाय अनेक धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी नाही.
Indore News: इंदूरमधील खजराना पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून गोळीबाराची घटना घडलीय. यात दोघांचा मृत्यू झालाय तर सहा जण जखमी झालेत. इंदूरच्या कृष्णबाग कॉलनीत काल रात्री 11 च्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबाराचा व्हिडीओदेखील समोर आलाय. गोळीबार करणारा गार्ड असल्याची माहिती मिळतेय.
नाशिक : अधिक मास समाप्तीनंतर (Adhik Mas) श्रावण महिन्याला (Shravan) सुरुवात झाली असून नाशिकजवळील त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) भाविकांचा मोठा उत्साह दरवर्षी पाहायला मिळतो. राज्यभरातून लाखो भाविकांची उपस्थिती श्रावण सोमवारसह श्रावण महिन्यात पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. श्रावण महिन्यात होणारी गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी मंदिर दररोज सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत तर एकुण 4 श्रावण सोमवारी पहाटे 4 ते रात्री 9 पर्यंत खुले असणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
15 दिवसाच्या उघाडीनंतर पावसाला सुरुवात
शेतकरी पावसच्या प्रतीक्षेत होते.
कपाशी, सोयाबीन, तूर, या पिकांना हा पाऊस फायदेशी
Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांची भेट घेतली. यावेळी शेट्टींनी शेती प्रश्नाच्या विविध मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. तसेच इथेनॅालच्या किंमत (Ethanol Price) वाढीसह साखर निर्यातीच्या (Sugar Export) धोरणावर केंद्र सरकारनं मार्ग काढावा अशी मागणी देखील राजू शेट्टींनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर 'जागतिक हेलियम दिवस' साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक
राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
विजयदुर्गवर आज साजरा होणार 'जागतिक हेलियम दिवस'
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी 'साहेबांचा ओट' या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून करणार आहेत.
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी
कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक
लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -