Girish Mahajan on Dhananjay Munde : बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) 22 दिवसांपासून बेपत्ता होता. तो 31 डिसेंबर रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. या प्रकरणावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे दिसून आले. 


धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा सध्या विषय नाही. विरोधक आरोप करीत असतात. नार्को टेस्ट कशासाठी करायची? मी एकनाथ खडसे यांची नार्को टेस्ट करा, असे म्हणत होतो. त्या वेळेला शरद पवारांनी (Sharad Pawar) मागणी मान्य केली का? असा सवाल करीत गिरीश महाजन यांनी धनंजय मुंडे यांना सावरून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 


नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन? 


धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड यांची नार्को टेस्ट करा ही मागणी जरी होत असली तरी गरज असेल तरच अशी टेस्ट होत असते. मी खडसे आणि माझी दोघांचीही नारकोटेस्ट करण्याबाबत हट्ट धरला होता, त्यावेळेला पवारांनी का ऐकले नाही? असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केलाय. तर  या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय कठोर पद्धतीने चौकशी करीत असून यात कोणालाही माफ केले जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.


गिरीश महाजनांचा संजय राऊतांना टोला


दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबवलेल्या धोरणांचे 'सामना'च्या अग्रलेखातून कौतुक करण्यात आले. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. याचे प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयांना कौतुक आहे, असे म्हणत फडणवीस यांचे कौतुक केले. याबाबत विचारले असता सध्या संजय राऊत यांना वस्तुस्थिती मांडण्याची बुद्धी आली असून त्यांना थोडे उशिरा शहाणपण सुचल्याचा टोला गिरीश महाजन यांनी राऊतांना लगावलाय. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Suresh Dhas : आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...


Manoj Jarange : हXXXX औलादीचा! देशमुख कुटुंबीयांना धमक्या दिल्या तर धनंजय मुंडेला रस्त्याला फिरू देणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा