Maharashtra Live Updates : पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक दोन तास बंद, आज दुपारी 12 ते 2 या वेळेत ब्लॉक
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Mumbai Pune Expressway: पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक दोन तास बंद राहणार आहे. द्रुतगतीवरील दरड हटविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल आहे. 12 ते 2 या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर दरड कोसळली...
आडोसी बोगद्या जवळ कोसळली दरड , मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर दरड कोसळली
मुंबईकडे येणारे तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प.
मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर दरड कोसळली...
आडोसी बोगद्या जवळ कोसळली दरड , मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर दरड कोसळली
मुंबईकडे येणारे तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प.
Nanded News : मनगटापासून वेगळा झालेला हाताचा पंजा पोलिसांनी प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये घालून नेला आणि डॉक्टरांनी मात्र जोडून देऊन मजुरी व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाला जीवनदान दिल्याची घटना नांदेडमध्ये (Nanded) समोर आली आहे.
Sant Muktai Palkhi : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढपुरात गेलेली संत मुक्ताईंची (Sant Muktai) पालखी पंचेचाळीस दिवसांचा प्रवास करुन आज पुन्हा जळगावात संत मुक्ताबाईंच्या समाधी स्थळी पोहोचली आहे. वाचा सविस्तर...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधान मोदी यांची दिल्ली निवासस्थानी भेट घेतली. याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही रिट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.
Kirit Somaiya Viral Video : सोमय्या व्हिडीओ प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये याबाबत चौकशीचं आश्वासन दिलं आहे. या प्रकाराने आम्हाला धक्का बसला असून भविष्यात याची पाळंमुळं शोधली जातील, असं चित्रा वाघ यांनी सांगितले. वाचा सविस्तर बातमी
एकनाथ खडसेंचे जावई गिरीष चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
भोसरी एमआयडीसी प्रकरणी अखेर जामीन मंजूर
7 जुलै 2021 रोजी ईडीनं मनी लाँड्रिंगच्या आरोपात केली होती अटक
पासपोर्ट जमा करत खटल्याच्या प्रत्येक सुनावणीत हजेरी लावण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.
मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -