एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पावसाची उघडझाप; जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरण 70 टक्के भरले 

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली आहेत. बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.   

Kolhapur Rain Update: गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur News) शुक्रवारी पावसाने उघडझाप दिली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होणारी वाढ काहीशी मंदावली आहे. आज दुपारी एक वाजेपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 35 फुट 2 इंच होती. दुसरीकडे राधानगरी धरणात 70 टक्क्यांच्या घरात पाणीसाठा झाला आहे. इतर धरणांमध्येही गेल्या चार दिवसांपासून झालेल्या पावसाने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख 15 प्रकल्पापैकी 3 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यातील राधानगरी, वारणा, कासारी, घटप्रभा, जांबरे आणि कोदे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. सर्वाधिक विसर्ग घटप्रभा प्रकल्पातून 5134 क्युसेकने विसर्ग होत आहे. 

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.   

पुढील चार दिवस पावसाचे

कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज (21 जुलै) आणि उद्या (22 जुलै) हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रविवारी (23 जुलै) आणि सोमवारी (24 जुलै) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

काळम्मावाडी धरणातही चांगली वाढ 

गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जिल्ह्याला मोठा दिलासा मिलाला आहे. पिकांना जीवदान मिळाले आहेच, पण धरणांमध्येही पाण्याची वाढ वेगाने होत असल्याने चिंता काहीशी दूर झाली आहे. राधानगरीसह काळम्मावाडी धरणातही वेगाने साठा होत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी धरणात केवळ 4.55 टीएमसी पाणीसाठा होता. तो आज सकाळपर्यंत 8.62 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने चिंता लागून राहिलेल्या शिरोळ, हातकणंगले तालुक्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

कोणत्या नदीवरील कोणता बंधारा पाण्याखाली?

कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसाने विविध नद्यांवरील 69बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 

  • पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
  • भोगावती नदी : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
  • कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे, करंजफेण
  • हिरण्यकेशी नदी : साळगाव, सुळेरान व चांदेवाडी, दांभीळ, ऐनापूर, निलजी 
  • घटप्रभा नदी : पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे व अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी
  • वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, कुरणी, वस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली, गारगोटी, म्हसवे, सुक्याचीवाडी, शेणगाव
  • कुंभी नदी : कळे, शेणवडे, वेतवडे, मांडुकली, सांगशी, असळज 
  • वारणा नदी : चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी, कोडोली, खोची 
  • कडवी नदी : भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव व सवते सावर्डे, सरुड पाटणे, 
  • धामणी नदी : सुळे, पनोरे 
  • तुळशी नदी : बीड 
  • ताम्रपर्णी नदी : कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाही, काकरे, न्हावेली 
  • दुधगंगा नदी : दत्तवाडी, सुळकूड 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget