![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sant Muktai Palkhi : विठुरायाची भेट झाली अन् परतीचा प्रवास पूर्ण, संत मुक्ताईंच्या पालखीचं जळगावात आगमन
Sant Muktai Palkhi : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढपुरात गेलेली संत मुक्ताईंची पालखी पुन्हा जळगावमध्ये पोहोचली आहे.
![Sant Muktai Palkhi : विठुरायाची भेट झाली अन् परतीचा प्रवास पूर्ण, संत मुक्ताईंच्या पालखीचं जळगावात आगमन Sant muktabai palkhi return in jalgoan from pandharpur ashadhi wari 2023 marathi news Sant Muktai Palkhi : विठुरायाची भेट झाली अन् परतीचा प्रवास पूर्ण, संत मुक्ताईंच्या पालखीचं जळगावात आगमन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/23/156527d68009399dc64e8da5fd35629d1690104133698720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sant Muktai Palkhi : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढपुरात गेलेली संत मुक्ताईंची (Sant Muktai) पालखी पंचेचाळीस दिवसांचा प्रवास करुन आज पुन्हा जळगावात संत मुक्ताबाईंच्या समाधी स्थळी पोहोचली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत मुक्ताईंची पालखी पंढपुराच्या दिशेने प्रस्थान करते. आषाढी एकादशीनिमित्ताने शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी पंढरपुराच्या दिशेने मार्गक्रमण करतात. त्यानंतर, आषाढी एकादशीनंतर पालखी पुन्हा एकदा समाधीस्थळाकडे प्रस्थान करत जळगावात परतली आहे. मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने मुक्ताई नगरच्या नागरिकांकडून या पालखीचे जळगावमध्ये स्वागत करण्यात आले आहे.
संत मुक्ताईंची पालखी पुन्हा जळगावात
आषाढी एकादशीला मानाचे स्थान असलेली संत मुक्ताईंची पालखी विठुरायाच्या भेटीसाठी पंढपुरात जाते. त्यानंतर विठुरायाची भेट घेऊन परतीचा प्रवास करत असते. या पालखी सोहळ्यात देशभरातील अनेक वारकरी सहभागी होत असतात. शहराच्या विविध भागातून जाताना या पालखीवर पुष्पवृष्टी देखील होत असते. तसेच संत मुक्ताबाईंचे नवीन मंदिर ते जुन्या मंदिरापर्यंत रथ यात्रा देखील काढले जाते. त्यामुळे पंढरपूरच्या पालखी सोहळ्याला जे वारकरी जाऊ शकले नाहीत, ते वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. शहराच्या विविध भागातून जाताना या रथ यात्रेचे सर्वजण दर्शन घेत असतात. संत मुक्ताईंच्या जयघोषात ही पालखी मुक्ताई नगरमध्ये दाखल होत असते.
विठुरायाच्या भेटीचा प्रवास
तब्बल सहाशे किलोमीटरचे अंतर असलेली मुक्ताईची पालखी दिवसाला पंचवीस ते तीस किलोमीटरवर ते अंतर कापत पंढरपूर गाठते. तर, मुक्कामानंतर मुक्ताई पालखीत नव्या वारकरी भाविकांची भर पडत असते. परिसरातील अनेक भाविक पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी या वारी सोहळ्यात सहभागी होत असतात. त्यामुळे पालखी निघाल्यापासून भाविकांची मांदियाळी जमण्यास सुरुवात होते. टाळमृदंगांच्या गजराने मंदिर परिसर दणाणून जातो. वारीमधील दिंडी सोहळ्यात मुक्ताईंचा जयघोष संत मुक्ताईंची पालखी प्रवास करत असते.
आषाढी एकादशीनंतर परतीचा प्रवास पूर्ण
पंढरीच्या वारीसाठी जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. जळगाव जिल्ह्यातील या मानाच्या पालखीचं मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने प्रस्थान होतं. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचं राज्याच्या अध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात मोठं मानाचं स्थान आहे. राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध पालख्यांपेक्षा जळगाव जिल्ह्यातील ही पालखी सर्वात आधी निघते. तशी ती पंढरपूर येथेही संत मुक्ताई पालखीचं पहिल्यांदा आगमन होत असतं.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)