Yashomati Thakur : अजितदादा तुम्हीसुद्धा… यशोमती ठाकूर यांचा सभागृहात हल्लाबोल; विरोधी पक्षाच्या आमदारांना मिळत नसल्याने आक्रमक
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
![Yashomati Thakur : अजितदादा तुम्हीसुद्धा… यशोमती ठाकूर यांचा सभागृहात हल्लाबोल; विरोधी पक्षाच्या आमदारांना मिळत नसल्याने आक्रमक Yashomati Thakur : अजितदादा तुम्हीसुद्धा… यशोमती ठाकूर यांचा सभागृहात हल्लाबोल; विरोधी पक्षाच्या आमदारांना मिळत नसल्याने आक्रमक](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.
मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Irsalwadi Landslide: पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं; 98 जणांना वाचवण्यात यश, 12 जणांचा मृत्यू
Yashomati Thakur : अजितदादा तुम्हीसुद्धा… यशोमती ठाकूर यांचा सभागृहात हल्लाबोल; विरोधी पक्षाच्या आमदारांना मिळत नसल्याने आक्रमक
काय घडलं? कसं घडलं? सध्याची परिस्थिती काय? बचाव कार्य कसं केलं जातंय? उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत सविस्तर सांगितलं
Khalapur Irshalwadi Landslide : सध्या बचाव कार्याला प्राधान्य, दोन हेलिकॉप्टर तयार, पण खराब हवामानामुळं टेकऑफ अशक्य : मुख्यमंत्री
Khalapur Irshalwadi Landslide : रात्री मित्रांसोबत शाळेत झोपलेलो, तेवढ्यात मोठ्ठा आवाज झाला अन्...; बचावलेल्या तरुणाचा काळीज पिवळटणारा थरारक अनुभव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)