Ajit Pawar : 'माझं अंतर्मन म्हणालं, आपण सिल्वर ओकवर गेलं पाहिजे, म्हणून गेलो'; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण 

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jul 2023 02:09 PM
Ajit Pawar Nashik : नाशिक जिल्ह्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही; अर्थमंत्री अजित पवारांचे सूतोवाच 
Ajit Pawar : नाशिक जिल्ह्याच्या कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. Read More
Ajit Pawar : "माझं अंतर्मन म्हणालं, आपण सिल्वर ओकवर गेलं पाहिजे, म्हणून गेलो"; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण 
Ajit Pawar Nashik : शरद पवार साहेबांचे घर आहे, ते तिथे असणारच, त्यांनाही भेटलो, इतर राजकीय चर्चा झाली नाही. Read More
Chandrayaan-3 : चांद्रयान 3 साठी महाराष्ट्राचं योगदान! मुंबईतील 'गोदरेज'चं इंजिन, पुण्यातील शास्त्रज्ञ अन् बुलढाण्यातील चांदी
Chandrayaan-3 ISRO Moon Mission : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेमध्ये महाराष्ट्राचंही योगदान आहे. यातील इंजिन मुंबईमध्ये बनवण्यात आलं तर, चंद्र मोहिमेसाठी बुलढाण्यातील चांदी वापरण्यात आली आहे. Read More
Nashik : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

Nashik News :  आज नाशिक शहरात होत असलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल आले आहेत. सध्या ओझर विमानतळावर उतरले असून तेथून ते नाशिकला रवाना झाले आहेत. काही वेळातच ते शहरातील शासन आपल्या दारी कार्यक्रम स्थळी दाखल होती. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळीच नाशिकला वंदे भारत एक्सप्रेसने दाखल झाले आहेत. 

Ajit Pawar On PM : पीएम नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही; नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य 
Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit Pawar) यांनी केलं आहे.  Read More
Nashik News : नाशिकला आज मंत्र्यांची मांदियाळी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाला नऊ मंत्र्याची उपस्थिती 
Nashik News : नाशिकच्या (Nashik) शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मंत्रिमंडळातील तब्बल नऊ मंत्र्याची उपस्थिती असणार आहे. Read More
Deputy CM Ajit Pawar: अजितदादा म्हणजे 'कामाचा माणूस'; आम्ही जनरल पब्लिक, आम्हाला तुमच्या बद्दल आदर, वंदे भारतमध्ये अजितदादांचीच क्रेझ
Deputy CM Ajit Pawar: नाशिकपर्यंतचा प्रवास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदे भारत ट्रेननं केला.  अजितदादांचं मोठ्या जल्लोषात नाशिकमध्ये स्वागत करण्यात आलं. Read More
Ajit Pawar Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाशिकमध्ये जंगी स्वागत, पायी चालत शक्तिप्रदर्शन
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकला दाखल झाले असून पायी चालत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. Read More
Saroj Ahire : अजितदादांनी भावासारखं प्रेम केलं, अखेर नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांच ठरलं... 

Saroj Ahire : अखेर नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी भूमिका जाहीर केली असून मतदारसंघातील विकासकामांसाठी सत्तेत जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार हे वडिलांसारखे असून अजित दादा भावासारखे आहेत, मात्र या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडत आमदार सरोज अहिरे आपलं निर्णय जाहीर केला आहे. मतदारसंघातील विकासासाठी अजित दादासोबत असल्याचे स्पष्ट करत नाशिक जिल्ह्यातील सहाही आमदार आता अजित पवार गटाकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Nashik Ajit Pawar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार नाशिक शहरात दाखल 

Nashik Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर दाखल झाले असून आज सकाळीच वंदे भारत एक्सप्रेसने ते नाशिकला निघाले होते. नुकतेच त्यांचे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आगमन झाले असून त्यांच्या स्वागतासाठी अजित पवार गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. असंख्य कार्यकर्ते रेल्वेस्थानकावर उपस्थित असून आज नाशिक शहरातील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकला दाखल झाले आहेत. 

खातेवाटप जाहीर होताच अजितदादा सिल्वर ओकवर; शपथविधीनंतर पहिल्यांदाच अजित पवार थोरल्या पवारांच्या निवासस्थानी
NCP Political Crisis: काल शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं अधिकृतपणे खातेवाटप जाहीर झालं आणि त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकला भेट दिली. Read More
Buldhana Crime : फिर्यादी म्हणतोय, बलात्कार झाला, मात्र 'ती' म्हणते, असं काहीच झालेलं नाही; बुलढाणा सामूहिक बलात्कार प्रकरणाला नवं वळण
Buldhana Crime News: फिर्यादी म्हणतोय, बलात्कार झाला, मात्र 'ती' म्हणते, असं काहीच झालेलं नाही.

बुलढाण्यातील सामूहित बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट


राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.


आज मंत्रिमंडळाची बैठक


राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.


काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा 


राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.


मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश


राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.