Mumbai BEST Strike : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला; मुंबईकरांसाठी एसटीही धावली
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
04 Aug 2023 09:29 PM
Maharashtra Gujarat Border Dispute : गुजरातचा महाराष्ट्रातील गावांवर दावा; दीड किमी घुसखोरी करत बेकायदा पथदिवे लावले
Maharashtra Gujarat Border Dispute : महाराष्ट्रातील गावांवर गुजरातमधील ग्रामपंचायतींनी दावा केला आहे. वेवजी गावात गुजरातच्या ग्रामपंचायतीने दीड किमी घुसखोरी करत बेकायदापणे पथदिव लावले आहेत.
Read More
Mumbai BEST Strike : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला; मुंबईकरांसाठी एसटीही धावली
Mumbai BEST Strike : बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला असून आता मुंबईकर प्रवाशांसाठी एसटी बसेस चालवण्यात येत आहे.
Read More
Devendra Fadnavis : बारसू आंदोलकांना बेंगळुरूमधून फंडिंग, फडणवीसांचा गंभीर आरोप; आंदोलकांनी दिलं चॅलेंज, सिद्ध करून दाखवा...
Devendra Fadnavis On Barsu Protest : आरे असो वा बारसू...यामध्ये आंदोलन करणाऱ्या एकाच व्यक्ती असून त्यांना परराज्यातून फंडिंग होत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. तर , आंदोलकांनी हे आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले.
Read More
Sangamner Sugar Factory : साखर अन् वीज दोन्हींची निर्मिती, दररोज 9 हजार मेगावॉट वीजनिर्मिती, राज्यातील पहिलाच प्रयोग
Sangamner : संगमनेर तालुक्यातील (Sangamner) भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यामध्ये साखर आणि वीज निर्मिती होणार आहे.
Read More
Pune Crime News : तलवारी दाखवून दहशत माजवली अन् डोंगरात लपला; पण अखेर पोलिसांच्या हाती लागलाच!
तलवारीने दहशत माजवणारा डोंगरात लपून बसलेला असतानाही पुणे पोलिसांनी त्याला हेरलं आणि अटक केली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात दहशत पसरवत होता.
Read More
Samruddhi Highway Potholes : समृद्धी महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण; 55 हजार कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर खड्डेच खड्डे, तर पुलांनाही भेगा
Samruddhi Highway Potholes : हजारो कोटींचा खर्च करुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर 6 महिन्यातच खड्डे, अपघाताचा धोका वाढला
Read More
Nashik News : नाशिककर ही बातमी तुमच्यासाठी! दुकानातून फरसाण, शेव खरेदी करत असाल सावधान! कारखाना पाहून..
Nashik News : नाशिक (Nashik) शहरात एका पत्र्याच्या शेडखाली अस्वच्छ असलेल्या कारखान्यात फरसाण, शेवचे उत्पादन घेत असल्याचे समोर आले आहे.
Read More
Kolhapur Crime: वारणानगरमध्ये पोलिसांनीच टाकलेल्या दरोड्याची भयंकर कहाणी; मुख्य आरोपीनंतर आता निलंबित एपीआयचा सुद्धा निर्घृण खून
Kolhapur Crime: एकाच प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यासह मुख्य आरोपीचा सुद्धा मुडदा पडल्याने भूवया उंचावल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे मोहिद्दीन मुल्लाच्या मारेकऱ्यांचा अजूनही शोध लागलेला नाही.
Read More
Pune Crime News : 72 वर्षीय आजीने दिली पुणे विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, महिलेवर गुन्हा दाखल
एका 72 वर्षाच्या आजीने थेट पुणे विमानतळ बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी दिली. विमानतळावर सुरक्षा तपासणीत वेळ लागल्याने धमकी दिली.
Read More
Nashik Nikhil Bhamare : नाशिकचा निखिल भामरे भाजपच्या सोशल मीडियाच्या सहसंयोजकपदी, शरद पवारांविषयीच्या पोस्टमुळे चर्चेत
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सटाणा येथील निखिल भामरे याची भाजपच्या आयटी सेलमध्ये सहसंयोजक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.
मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.