मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठपदरी होणार; MSRDC चा प्रस्ताव, वाहतूक कोंडी वाढल्यानं रस्ते महामंडळाचा निर्णय

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 11 Sep 2023 02:21 PM
Pune Manache Ganpati : पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीचा क्रम कोणी आणि कधी ठरवला होता? जाणून घ्या गणपती विसर्जन मिरवणुकीचा इतिहास...
पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला देखील इतिहास आहे. जाणून घेऊयात पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीच्या इतिहासाबद्दल... Read More
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठपदरी होणार; MSRDC चा प्रस्ताव, वाहतूक कोंडी वाढल्यानं रस्ते महामंडळाचा निर्णय
Maharashtra News: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच आठपदरी होणार असून त्यासंदर्भातील प्रस्ताव MSRDC च्या वतीनं राज्य सरकारला पाठवण्या आलाय.

वाहतूक कोंडी वाढल्यानं रस्ते महामंडळानं निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. Read More
Beed Accident: कंटेनरने रिक्षाला चिरडलं; भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
Beed Accident: बीडच्या धारूर तालुक्यातील घाटसावळी येथे रिक्षा आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. Read More
Kareena Kapoor : राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीने उभी राहिल्याने करीना कपूर ट्रोल; चाहते म्हणाले,"सावधान राहायचं असतं"
Kareena Kapoor Video : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Weather Update: पावसामुळे कुठे दिलासा, तर कुठे आपत्ती; दिल्लीसह इतर राज्यांत आज कसं असेल हवामान? पाहा हवामान विभागाचा इशारा
IMD Weather Update: हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज देशातील अनेक राज्यांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. एवढंच नाही तर अनेक ठिकाणी वीज पडण्याचीही शक्यता आहे. Read More
ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला, सात मजुरांचा दुर्दैवी मृत्यू
Thane News: ठाण्यातील बाळकुम येथे निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


केंद्र सरकारकडून संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे 18 ते 22 सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात 5 सत्र होणार आहेत.केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या मानसिकतेत आहे, तर राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहेत. 


राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना


 महाराष्ट्र राज्यात अमंली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन करण्याचे प्रमाण वाढत असल्याने ड्रग्जला रोखण्यासाठी राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.पोलीस महासंचालकांचे मार्गदर्शन आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या नियंत्रण याचा देखरेखीखाली विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अधिपत्याखाली ही टास्क फोर्स काम करेल 


 इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस


मुंबई मध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीचा आज दुसरा आणि महत्वाचा दिवस आहे.या बैठकीसाठी 28 पक्षांचे 63 प्रतिनिधी म्हणजे नेते मुंबईत उपस्थित आहेत. इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या प्रतिनिधींचा ग्रुप फोटोसेशन.. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक


 महायुतीच्या बैठकीचा दुसरा दिवस


महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे.सकाळी 9 वाजता, एनएससीआय येथे विभागवार बैठकीतून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.


आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे


आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. मुंबई दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दुधाच्या दरात एकाच वेळी दोन रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून नवीन दर लागू होतील. 85 रुपयांऐवजी आता 87 रुपये लिटरने दूध मिळणार आहे. चारा आणि जनावरांच्या चाऱ्याच्या दरात 20 टक्के वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.


आजपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे काही महत्वाचे बदल


देशातील ऑईल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतींत बदल करतात. अशा परिस्थितीत 1 सप्टेंबरपासून LPG सिलेंडर्सच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हवाई इंधनाच्या (ATF) किमती बदल करतात, त्यामुळे यावेळेस सप्टेंबरच्या पहिल्या तारखेलाही CNG-PNG च्या दरांत बदल केला जाऊ शकतो.


 उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर


उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे बांधण्यात येत असलेल्या 'महेंद्रगिरी' या युद्धनौकेच्या कार्यान्वित समारंभाला उपस्थित रहाणार आहेत. 'महेंद्रगिरी' ही MDL ने बांधलेली चौथी युद्धनौका आणि भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत सातवी स्टेल्थ फ्रिगेट आहे.
 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.