JSW Cement IPO: पैसे तयार ठेवा,जेएसडब्ल्यू सिमेंट 4000 कोटींचा आयपीओ आणणार, सेबीकडून मंजुरी, गुंतवणूकदारांना मोठी संधी
भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर आयपीओ येत आहेत. या आयपीओंमध्ये गुंतवणूक करुन अनेकांना चांगला परतावा देखील मिळालेला आहे. आता सज्जन जिंदाल यांची कंपनी जेएसडब्ल्यू सिमेंट कंपनीचा आयपीओ येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेएसडब्ल्यू सिमेंटचा आयपीओ 4 हजार कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला जाईल. आयपीओ कधी खुला होणार याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. सेबीनं जेएसडब्ल्यू सिमेंटला आयपीओसाठी परवानगी दिलेली आहे.
जेएसडब्ल्यू सिमेंटच्या आयपीओसाठी बोली लावण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होऊ शकते. या आयपीओच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांचे नवे इक्विटी शेअर जारी केले जातील. तर, दोन हजार कोटींच्या शेअरची ऑफर फॉर सेलद्वारे विक्री केली जाईल. अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट, सिनर्जी मेटल्स इन्वेस्टमेंटस होल्डिंग्ज आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफर फॉर सेलद्वारे त्यांच्या शेअर्सची विक्री करेल.
2021 मध्ये सिमेट उद्योग क्षेत्रातील कंपनी नुवोको विस्टाचा आयपीओ आला होता. तो आयपीओ 5 हजार कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आला होता. सिमेंट उद्योगात अदानी ग्रुप आणि आदित्य बिर्ला ग्रुप यांच्यात जोरदार स्पर्धा सुरु असताना जेएसडब्ल्यू सिमेंटचा आयपीओ येत आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार जेएसडब्ल्यू सिमेंटनं ऑगस्ट 2017 मध्ये परवानगी मागितली होती.
जेएसडब्ल्यू सिमेंट कंपनी स्वत : ग्रीन सिमेंट उत्पादक असल्याचा दावा करते. आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या रकमेपैकी 800 कोटी रुपयांचा वापर राजस्थानातील नागौडमध्ये एक सिमेंट उत्पादक यूनिटची स्थापना केली जाईल. 720 कोटींचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी केला जाईल. उर्वरित रक्कम सामान्य खर्चासाठी केला जाईल. या कंपनीची सुरुवात 2009 मध्ये दक्षिण भारतात झाली होती. त्यांच्याकडे सिमेंटचे 7 प्लांट आहेत. जेएसडब्ल्यू सिमेंटचा या क्षेत्रात विस्तार करण्याचा मानस आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)